मुंबई: दिग्गज उद्योगपती आणि टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांच्याकडे मोदी सरकारनं महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. रतन टाटांची नियुक्ती पीएम केअर्स फंडचे नवे विश्वस्त म्हणून करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती के. टी. थॉमस आणि लोकसभेचे माजी सभापती करिया मुंडा यांच्याकडेही पीएम केअर्स फंडचं विश्वस्तपद देण्यात आलं आहे. पंतप्रधान कार्यालयानं याबद्दलची माहिती दिली आहे.

पीएम केअर्स फंडच्या विश्वस्तांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन उपस्थित होते. सीतारामन आणि शहा पीएम केअर्स फंडचे विश्वस्त आहेत. या बैठकीत रतन टाटा, के. टी. थॉमस आणि करिया मुंडा यांना पीएम केअर्स फंडचे विश्वस्त म्हणून नेमण्याचा निर्णय झाला.
कौतुकास्पद! मुस्लिम जोडप्याकडून बालाजीला एक कोटी देणगी; यापूर्वीही दिलीये विविध वस्तूंची भेट
देशातील काही अन्य प्रख्यात व्यक्तिमत्त्वांचा समावेश सल्लागार समितीत करण्यासाठी मोदी सरकारनं त्यांची नावं निश्चित केली आहेत. त्यामध्ये माजी महालेखापाल राजीव महर्षी, इन्फोसिस फाऊंडेशनच्या माजी संचालक सुधा मूर्ती, इंडिकॉर्प्स आणि पिरामल फाऊंडेशनचे माजी सीईओ आनंद शहा यांच्या नावांचा समावेश आहे.
बाईक काढताना तोल गेला, तरुण खड्ड्यात पडला; पण नशीब बलवत्तर निघालं; पाहा VIDEO
पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम केअर्स फंडचे अध्यक्ष आहेत. २०२० मध्ये करोना महामारीदरम्यान पीएम केअर्स फंडची स्थापना करण्यात आली. २७ मार्च २०२० रोजी पीएम केअर्स फंड अस्तित्वात आला. अनेक उद्योगपतींनी, उद्योग समूहांनी, सर्वसामान्यांनी यामध्ये भरभरुन दान केलं. मात्र पीएम केअर्स फंड अनेकदा विरोधकांच्या निशाण्यावर राहिला. पीएम केअर्समध्ये जमा होणाऱ्या रकमेचा हिशोब, त्यातील पारदर्शकता यावरून बरीच टीका झाली होती.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.