म.टा. प्रतिनिधी, नागपूर: ‘पप्पा, माझे पती, सासू व त्यांचे नातेवाइक माझा शारीरिक व मानसिक छळ करीत आहेत. मला छळ असह्य झाला आहे, मी आता जगू शकत नाही’, अशा आशयाचा वडिलांना फोन करून उच्चशिक्षित नवविवाहितेने आत्महत्या केली. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. रितू राहुल पटले (वय २६), असे मृत विवाहितेचे तर राहुल राजेश पटले (वय ३२), सासू रेखा राजेश पटले (वय ५४, दोघेही रा. ओमनगर), नणंद राणी राहंगडाले (वय ३३) व मिनू, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सेवकराम मयाराम टेंभरे (वय ५४, रा. सुभाषनगर, बुडी बालाघाट) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. रितू यांचे बीएड झाले आहे. सेवकराम हे मध्य प्रदेश पोलिस दलात साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक असून, राहुल हा प्रॉपर्टी डिलर आहे.

रितूचे राहुलसोबत १० मे रोजी लग्न झाले. सेवकराव यांनी लग्नात मुलीला सहा तोळे व जावयाला अडीच तोळ्यांचे दागिने व अन्य साहित्य दिले. लग्नानंतर चौघेही कमी हुंडा दिल्याने रितूचा छळ करायला लागले. तिला मारहाण करून धमकी द्यायचे. सोन्याचे दागिनेही रितूकडून हिसकावून घेतले. त्यांच्या त्रासाला रितू कंटाळली. शनिवारी रितूने सेवकराम यांना फोन करून छळाची माहिती दिली. त्यानंतर तिने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेतला. याप्रकरणी सेवकराम यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *