परभणी : तुझे फोटो व्हायरल करील, तुला आणि तुझ्या पतीला आणि मुलांना खत्म करून टाकीन, अशी धमकी देऊन महिलेवर अत्याचार केल्याची घटना परभणीच्या पालम तालुक्यातील गुळखुंड येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या ( Parbhani News Today ) तक्रारीवरून पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख मुस्तफा शेख जिलानी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

गुळखुंड येथील शेख मुस्तफा शेख जिलानी या आरोपीने गावातील पीडित महिलेला रविवारी रात्री धमकी दिली. तुझे माझ्याकडे असलेले फोटो व्हायरल करील, तुझ्या पतीला, तुला आणि मुलांना खत्म करून टाकीन, अशी धमकी त्याने दिली. महिलेच्या असहाय्यतेचा फायदा उचलत महिलेवर बळजबरीने अत्याचार केला, अशी माहिती या प्रकरणी पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सफरचंद खरेदी करताना महिलेला तरुणाने बाईकवर बसण्यास सांगितले, पुढे जे घडले ते धक्कादायकच

याबाबत कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकीही आरोपीने महिलेला दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने पालम पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. त्यावरून आरोपी शेख मुस्तफा शेख जिलानी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून परभणी जिल्ह्यामध्ये महिला अत्याचारांच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. पोलीस प्रशासनाने महिला अत्याचारांच्या घटनेला आळा घालण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

तलवार घेऊन हळदीला गेले, ढोल- ताशांच्या गजरात नाचले; पोलिसांनी व्हिडिओ पाहिला अन्…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.