परिवर्तन:स्टार्टअप ‘द फॅमिली मेंबर’चा २ लाख निराधार वृद्धांना आश्रय, तीन हजारांवर तरुणांना राेजगार
तरुणांचा देश असे संबोधल्या जाणाऱ्या भारतात वृद्धांच्या देखभालीचे कार्य करणारे स्टार्टअप ‘द फॅमिली मेंबर’ने ७ वर्षांत २ लाखांहून जास्त ज्येष्ठांची शुश्रूषा केली आहे. यातून तीन हजारांहून जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे. गुजरातचे हे स्टार्टअप ज्येष्ठ नागरिक व आजाराने पीडित लोकांच्या दैनंदिन जीवनात मदत करते. कारण ही वृद्ध मंडळी स्वत:ची योग्य प्रकारे देखभाल करू शकत नाहीत. स्टार्टअपचे संस्थापक पीयूष वायडा व सहसंस्थापक विभूती वायडा आहेत. विभूती म्हणाल्या, करिअर किंवा इतर कारणांमुळे अनेकांची मुले शहरात किंवा परदेशात वास्तव्याला असतात. त्यामुळे अशी वयोवृद्ध मंडळी स्वत:ची देखभाल करू शकत नाहीत. आम्ही अशा लोकांची चिंता दूर करतो. या क्षेत्रात रोजगार करण्यासाठी इतरांच्या वेदना जाणून घेता यायला हव्यात. इतरांच्या व्यथा,वेदनांची जाणीव असलेल्यांना रोजगाराच्या अनेक संधी या क्षेत्रात आहेत. अशा व्यक्तिमत्त्वाचे लोक वृद्धांसाठी सहज अशा प्रकारचे वातावरण तयार करतात. स्टार्टअप तरूणांमध्ये धैर्य, प्रेमाचा संवाद, इतरांचे त्रास, वेदना यांची जाणीव असणे इत्यादीविषयीचे कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम करते. स्टार्टअप ‘ द फॅमिली मेंबर’ तीन दिवसांचे विशेष प्रशिक्षण देेते. यातून तरूणांना वृद्धांशी ताळमेळ ठेवता येतो. अर्थात वृद्धांची मन:स्थिती लक्षात घेऊन त्यांच्याशी वर्तन करणे अपेक्षित आहे.
७० % प्रकरणांत वृद्धांना मदतीची गरज भासते
७० % प्रकरणांत वृद्धांना वयोमानानुसार मदतीची गरज भासते. सहायक स्टाफ त्यांना वेळेवर आैषधी देणे, भोजन देणे, झोपवणे इत्यादी कामे करतात. स्टार्टअपचे स्वत:चे कॅम्पस नाही. पण वृद्धांना स्टार्टअप सद््विचार परिवार, जनसाधान ट्रस्टमध्ये ठेवून मदत करते. -पीयूष वायडा, संस्थापक, ‘द फॅमिली मेंबर’
महिलांसाठी कामाच्या जास्त संधी..
पीयूष म्हणाले, वृद्धांच्या देखभालीत रोजगाराच्या संधीबाबतीत सांगायचे तर यात पुरुषांपेक्षा महिलांना जास्त संधी आहेत. इतरांच्या देखभालीत महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त सहज असतात. स्टार्टअपने ‘सेवा’ सारख्या एनजीआेच्या सहकार्याने प्रशिक्षण देत महिलांना या कामासाठी तयार केले.