संसद अधिवेशनात ठरणार दिल्ली, बिहार निवडणुकीसह रालोआ-इंडियाची दिशा:महाराष्ट्रासोबत झारखंड विधानसभेचाही आज निकाल
संसदेचे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. गेल्या दहा वर्षांतील ते सर्वात आक्रमक ठरू शकते. त्यात सत्ताधाऱ्यांचा दबदबा राहणार की विरोधकांचा हे शनिवारच्या महाराष्ट्र व झारखंडमधील विधानसभा निवडणूक निकालातून स्पष्ट होईल. निकालांतून भाजपला झटका बसल्यास केंद्र सरकारसाठी विरोधकांसह सहकारी पक्षांना सांभाळणेदेखील कठीण होऊ शकते. २०२५-२६ चे बजेटही दोन महिन्यांनंतर फेब्रुवारीत येणार आहे.
त्याशिवाय हा निकाल २०२५ मध्ये िदल्ली-बिहारमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवरही परिणाम करणारा ठरू शकतो. बिहारमध्ये भाजपचे राजकीय भवितव्य नितीशकुमार यांच्या हाती आहे. अदानी प्रकरणावर काँग्रेसने जेपीसीची मागणी लावून धरली आहे. मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळल्याने आणि तेथे पंतप्रधान फिरकलेदेखील नसल्याने सरकारने आधीपासूनच बचावात्मक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. एक्झिट पोलची ‘परीक्षा’; लोकसभा, हरियाणावेळी चुकीचे झारखंड; पोल ऑफ पोल्सनुसार ८१ पैकी ३९ जागी भाजप +,३८ काँग्रेस + जागांचा अंदाज आहे. भाजप+ला चाणक्यने ४५-५० व पीपल्स पल्सने ४४-५३ जागा दिल्या. ॲक्सिस माय इंडियाने काँग्रेस+ला ४९-५९ व भाजप+ला १७-२७ जागा दिल्या. बहुमतासाठी ४१ हा आकडा हवा. वायनाडहून प्रियंका गांधी लोकसभा जिंकल्यास काँग्रेससंबंधी गांधी परिवाराचे ३ सदस्य संसदेत… केरळच्या वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी जिंकल्यास लोकसभेत काँग्रेस खासदारांची संख्या १०० होईल. तसे झाल्यास काँग्रेससंबंधी गांधी परिवारातील तीन सदस्य एकाच वेळी संसदेत दाखल होण्याची ही पहिलीच वेळ असेल. वायनाड मतदारसंघ काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोडला होता.