बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनचे (hrithik roshan) गुड लुक्स आणि स्टाईल याबद्दल तुम्हाला वेगळं काय सांगायचं? अगदी मोजकेच चित्रपट करणारा हा अभिनेता आजही इतका फेमस आहे आणि आजही त्याची इतकी क्रेझ आहे याचे कारण म्हणजे त्याची स्टाईल आणि फॅशनच! पण तुम्हाला माहीत आहे का त्याचा प्रमाणेच त्याच्या घरातील अजून एक व्यक्तीची सध्या हॉट लुक्ससाठी चर्चा होत आहे आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आहे हृतिक रोशनची बहिण!

पश्मीना रोशन (pashmina roshan) असे तिचे नाव असून ती देखील लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ‘इश्क विश्क’ (ishq wishq) या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वेल येत असून त्यामध्ये ती दिसणार आहे. आणि म्हणूनच की काय सोशल मीडियावरील तोच प्रेझेन्स खूप वाढला आहे. तिच्या लुक्स समोर जान्हवी कपूरसारख्या अभिनेत्रीचे ग्लॅमर सुद्धा फिके पडत आहे. (फोटोज साभार – इंस्टाग्राम @pashminaroshan)

को-आर्ड सेटमध्ये दिसली पश्मीना

नुकताच पश्मीनाने सोशल मीडियावर आपला एक हॉट लुक शेअर केला आणि तो फोटो पाहताच पाहणाऱ्या प्रत्येक नजरा तिच्यावर स्थिरावल्या. म्हणजे एवढा हॉट लुक एखाद्या अभिनेत्रीचाच असू शकतो असे आजवर सर्वांना वाटत होते पण पश्मीनाने ही गोष्ट खोटी ठरवून दाखवली. तिने रेड कलरच्या को-आर्ड सेट मध्ये हॉट पोझ दिली होती. तिचा एकंदर लुक इतका सेक्सी आणि हॉट दिसत होता की तिच्यावरून नजर हटवणेच मुश्कील होते. म्हणूनच की काय सगळीकडून या लुक्ससाठी तिला वाहवा मिळाली.

(वाचा :- Disha Parmar bralette : छोटीशी पॅंट व ब्रालेट घालून दिशा परमारने फ्लॉन्ट केली सडपातळ कंबर, हॉटनेसपुढे सुर्यही फिका, बोल्ड फोटोज तुफान व्हायरल..!)

ब्रालेट टॉपसोबत स्लीट स्कर्ट

पश्मीनाने या सेटमध्ये स्ट्रेपलेस ब्रालेट टॉपसोबत एमिसिट्रिकल स्लिट स्कर्ट परिधान केला होता, ज्यात तिची सडपातळ कंबर मस्त फ्लॉन्ट होताना दिसत होती. हा फोटो पाहिल्यावर आमची उत्सुकता अर्थातच चाळवली गेली आणि आम्ही तिचे अन्य फोटोज देखील पाहिले आणि अपेक्षेप्रमाणे तिचे हे अन्य फोटोज सुद्धा कमालीचे आकर्षक ठरले. ज्यामधील तिचा फॅशन सेन्स आणि स्टाईल वाखाणण्याजोगी होती. चला तर पाहुया तिचे असेच काही भन्नाट फोटोज ज्यावरून नजर हटणारच नाही.

(वाचा :- छोटासा स्कर्ट घालून मीरा राजपूतने शेअर केले बोल्ड फोटोज, घायाळ नवरा शाहीद कपूरलाही चक्क सोशल मीडियावर करावी लागली ‘ही’ कमेंट..!)

बॅकलेस मिनी ड्रेस

या फोटोमध्ये पहा पश्मीनाने मल्टीकलर बॅकलेस मिनी ड्रेसमध्ये कशी किलर पोझ दिली आहे. ज्यात तिचे टोन्ड लेग्स सुद्धा फ्लॉन्ट झाले आहेत. पश्मीनाला अगदी बरोबर माहित आहे की व्हेकेशनला गेल्यावर कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावेत, जे कम्फटेर्बल तर असतीलच पण जेव्हा फोटो काढू तेव्हा त्यात अप पण आकर्षक सुद्धा दिसू. तिचं अजून एका फोटोत तिने ऑफव्हाईट कलरची मोनोकोनी परिधान केली होती आणि त्यात ती सायकलिंग करताना दिसली. यातून दिसले की सनबाथ घेण्यासाठी तिने आपल्या कपड्यांचे परफेक्ट सिलेक्शन केले होते.

(वाचा :- सैफची लाडकी लेक सारा अली खानने बिकिनी टॉपमध्ये केलं इतकं बोल्ड फोटोशूट, चाहत्यांनी झूम करून करून पाहिले फोटो..!)

वेकेशनच्या कपड्यांचे वेगवेगळे कलेक्शन

पश्मीनाला चांगलेच माहित आहे की तिला सुट्टीत कोणते कपडे घालून चील मारायचं आहे. या फोटोत ती ऑफव्हाइट कलरच्या मोनोकोनीमध्ये सायकल चालवताना दिसते आहे. तिने सनबाथ घेण्यासाठी या सेक्सी कपड्यांची निवड केली आहे.

(वाचा :- शाहरूख खानची लाडकी लेक सुहानाच्या हॉट फिगरवरून नजर हटवणं मुश्किल, बोल्ड क्रॉप टॉप घालून दिशा पाटणीला दिली तगडी टक्कर..!)

कॅज्युअल लुकमधला जलवा

रेड कलरच्या निटेड क्रॉप टॉपसोबत पश्मीनाने ब्ल्यू डेनिम रिप्ड जीन्स परिधान केली होती, ज्याचा पॅटर्न हेमलाईनवर फ्लेयर्ड होता. मिनिमल मेकअपसोबत पश्मीना खूपच जास्त हॉट दिसत होती. समर सिझनमधील तिचे काही लुक्स सुद्धा भन्नाट होते. उन्हाळ्याच्या काळात फ्लोरल प्रिंट्स असणाऱ्या कपड्यातील तिचे काही फोटोज आढळले. जे तिला खूपच जास्त सूट होत होते. जर तुम्ही सुद्धा व्हेकेशन वर जात असाल तर स्वत:साठी असेच कपडे निवडा.

(वाचा :- फिकट रंगाची साडी व केसांत सुंदरसं चमेलीचं फुल घालून जया बच्चन पोहचल्या अंबानींच्या घरी, थेट रेखाच्या सुंदरतेला दिली तगडी टक्कर..!)

गरमी असो वा पाऊस, बेस्ट आउटफिट

अशा फ्लोरल प्रिंट्सचे कपडे उन्हाळ्यात खूप छान दिसतात. तुम्हीही जर सुट्टीवर जात असाल तर तुम्ही स्वतःसाठीही अशा प्रकारचे को-आर्ड सेट घेऊ शकता. ज्यामधील रॅप टॉप आणि स्लिट स्कर्ट तुम्हाला सेक्सी लुक देण्यास मदत करतील.

(वाचा :- स्लिट ड्रेसमध्ये मलायका अरोराचं हॉट फोटशूट, फोटो पाहून इंटरनेटचा पाराच वाढला)

भावासोबत आहे बॉन्डिंग

आता अनेकांना आजच कळले असेल की हृतिकला एक बहिण सुद्धा आहे. पण जरी हृतिक आणि तिला आपण एकत्र जास्त पाहिले नसेल तरी याचा अर्थ हा नाही की दोघांमध्ये काही वाद आहेत किंवा दोघांचे नाते चांगले नाही. उलट दोघांचे नाते खूप जास्त घट्ट आहे. हृतिकची पश्मीना वर खूप माया आहे आणि तेवढेच प्रेम पश्मीना देखील आपल्या भावावर करते. आता ती बॉलीवूडमध्ये येत आहे आणि अशावेळेस तिला तिच्या भावाचा सपोर्ट लागणारच आहे, तेव्हा हृतिक सुद्धा नेहमी तिच्या पाठीमागे ठामपणे उभा असलेला आपल्याला नक्की दिसेल.

(वाचा :- उफ ! दिशा पाटनीचा मिरर सेल्फी, बोल्डनेसच्या सर्व सीमा पार, स्टायलिश फोटो पाहून चाहते म्हणाले ‘हॉटनेस ओव्हरलोड’)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.