गुवाहाटी: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित पठाण सिनेमाला देशभरातून तुफान प्रतिसाद मिळत आहे. बऱ्याचशा चित्रपटगृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागले आहेत. त्यामुळे अनेकांना तिकिटं मिळत नाहीएत. पठाणवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन काही संघटनांकडून करण्यात आलं होतं. भगव्या बिकनीमुळे वादही झाला. मात्र शाहरुखच्या चाहत्यांनी पठाण सुपरहिट केला आहे. मात्र शाहरुखच्या एका जबरा फॅनला हा सिनेमा पाहता आलेला नाही. विशेष म्हणजे या चाहत्याकडे पठाणची तब्बल १२० तिकिटं होती. मात्र तरीही तो चित्रपटगृहात जाऊ शकला नाही.

आसामच्या मंगलढोईमध्ये वास्तव्यास असलेल्या सदिफुल इस्लाम नावाच्या तरुणानं पठाण सिनेमाची तब्बल १२० तिकिटं काढली. तो मंगलढोई जिल्ह्यातल्या ढोलाचा रहिवासी आहे. ‘आम्ही चित्रपट पाहण्याची तयारी करत असताना अनेक संघटनांनी धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आम्ही त्यांचं आव्हान स्वीकारलं. इशान्य आमच्या अल्पसंख्याक विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी १२० तिकिटं काढली. आम्हाला चित्रपटगृहांमध्ये जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्याचे जे परिणाम होतील, त्याची जबाबदारी आमची नसेल,’ असं सदिफुल म्हणाला होता.
पासपोर्ट पाहून तरुणाला एअरपोर्टवर रोखलं; अधिकाऱ्यांना संशय; जन गण म्हणायला लावलं अन् मग…
सदिफुल आणि त्याच्या मित्रांकडे १२० तिकिटं होती. बुधवारी पठाण चित्रपट प्रदर्शित झाला आणि कहाणीला वेगळंच वळण मिळालं. २७ वर्षांच्या सदिफुलला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ‘मला बोलायची परवानगी नव्हती. पोलिसांनी मला सांगितलं, यामध्येच तुझं भलं आहे,’ असं सदिफुल म्हणाला. पोलिसांनी सदिफुलला सकाळी ९.३० वाजता ताब्यात घेतलं आणि संध्याकाळी ५ नंतर सोडून दिलं.
VIDEO: बारिश कर दू पैसे की… तरुणानं पुलावरून पाडला पैशांचा पाऊस; नोटा उचलायला तोबा गर्दी
आम्हाला चित्रपट पाहण्यापासून रोखल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा स्वरुपाची धमकी सदिफुलनं एका संघटनेला दिली होती. त्यामुळे सदिफुलला ताब्यात घेण्यात आलं होतं, असं पोलिसांनी सांगितलं. पठाण प्रदर्शित झाल्यानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील एका चित्रपटगृहात तोडफोड केली. चित्रपटाचे पोस्टर जाळले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *