पिंपरी: अनेक नागरिकांना आपल्या घराजवळ अनेक प्रकारची झाडे लावण्याचा छंद असतो. त्यात फुलांची झाडे, फळांची झाडे, शो ची झाडे लावली जातात. मात्र पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या पिंपळे निलख एका बहाद्दराने थेट घरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत गांजाची झाडे लावण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जवळ राहणाऱ्यांनी कपाळालाच हात मारला.
आरक्षण मिळेपर्यत शाळेत जाणार नाही; विद्यार्थ्यांनी शपथ घेतली, पालकांचा वेगळाच निर्धार, वाचा नेमकं प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात एका भाड्याच्या चाळीत राहणाऱ्या धानेश अनिरुद्ध शर्मा (३४) असे या व्यक्तीचे नाव आहे. अमली विरोधी पथकाने १ लाख ९६ हजार ९३० रुपये किमतीची म्हणजेच १२ किलो ४६२ ग्रॅम गांजाची झाडे जप्त केली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी मितेश यादव यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सात उत्तरपत्रिकांवर पाचशेच्या नोटा चिकटवल्या, विद्यार्थ्यांवर पुढील चार परीक्षांसाठी बंदी

याबाबत अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, धानेश शर्मा हा फर्निचरचे काम करीत असून तो पिंपळे निलख येथे एका चाळीत राहत आहे. चाळीतील त्याच्या राहत्या खोलीसमोर मोकळी जागा आहे. तेथे काही झाडे आणि झुडपे आहेत. दरम्यान, शर्मा याने तेथे गांजाची दोन झाडे लावली. याबाबत अंमली पदार्थ विरोधी पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन कारवाई करत शर्मा याला अटक केले. त्याच्या खोलीसमोरील मोकळ्या जागेतून १ लाख ९६ हजार ९३० रुपये किमतीची १२ किलो ४६२ ग्रॅम वजनाची गांजाची दोन झाडे जप्त करण्यात आली आहेत. याचा पुढील तपास सांगवी पोलीस करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *