मुंबई : पत्राचाळ प्रकरणात माझ्यावर आरोप केले गेले आहेत. मी चौकशीला तयार आहे. माझी लगेच चौकशी करा. पुढच्या ८-१० दिवसांत माझी चौकशी केली तरी चालेल, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचं आव्हान स्वीकारलं. त्यानंतर आता भाजपनेही आक्रमक होत पवारांना पत्राचाळ प्रकरणावरच तीन सवाल विचारले आहेत. पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपने ट्विट करुन त्यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात शरद पवार यांच्या सहभागाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

भाजपचे शरद पवारांना सवाल

“शरद पवारसाहेब, तुम्हीच सांगा पत्राचाळीतील ७०० च्या वर बेघर झालेल्या मराठी कुटुंबियांना की, केंद्रीय कृषिमंत्री पदी असताना, एका चाळीच्या पुनर्वसनसाठी ‘म्हाडा’ च्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीचं काय प्रयोजन होतं? देशाचे कृषीमंत्री म्हाडाच्या बैठकीत कशासाठी? साहेब, तुमच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प होत होता तर एवढी ससेहोलपट मराठी माणसाची का झाली? बेघर झालेले मराठी कुटुंबियांची वेदना जाणून का घेतल्या नाहीत? असे ३ सवाल करुन भाजपने पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच अशा निष्फळ बैठका घेऊन काय फायदा? ७०० च्या वर मराठी कुटुंब बेघर झालेत त्याचं काय?, असा सवाल पवारांची बाजू नेटाने मांडणाऱ्या आव्हाडांना भाजपने विचारलाय.

माझ्यावर आरोप केलेत ना, आता लगेच चौकशी करा, पण एका अटीवर… पवारांनी भाजपचं आव्हान स्वीकारलं
पवार म्हणाले, माझी लगेच चौकशी करा पण एक अट….

“माझ्यावर आरोप केलेत ना, आता लगेच चौकशी करा… मी तर म्हणतो पुढच्या ४-८-१० दिवसांत या प्रकरणात माझी चौकशी लावा पण त्या आरोपांमध्ये जर काही तथ्य नसेल तर आरोप करणाऱ्यांसंबंधी राज्य सरकारची काय भूमिका असेल हे आधी स्पष्ट करा”, असं पवार म्हणाले.

३ तासांनंतरही कार्यक्रम सुरु नाही, शिंदे फडणवीसांना उशीर, अजितदादा निघून गेले, नेमकं काय घडलं?
भाजपचे पवारांवर गंभीर आरोप

शिवसेना नेते खासदार संजय राऊत ज्या पत्राचाळ प्रकरणात जेलमध्ये गेलेत, त्याच प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सहभागाची चौकशी करा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. संजय राऊत यांच्याविरोधात ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर बोट ठेवत भातखळकरांनी शरद पवार यांचीही याप्रकरणातल्या सहभागाविषयी चौकशी करण्याची मागणी केली. भातखळकरांच्या पत्रानंतर ही चौकशी होणार का? असा प्रश्न विचारला जात असतानाच आज खुद्द पवारांनीच भाजपचं आव्हान स्वीकारलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.