नवी दिल्ली:paytm Charges: आजकाल प्रत्येकजण डिजिटल वॉलेट अॅप पेटीएमचा वापर करतो. पेटीएमचा वापर फक्त सर्वात लहान आणि मोठ्या पेमेंटसाठी केला जातो. तुम्ही देखील प्रत्येक गोष्टीसाठी पेटीएम वापरत असाल तर तुम्हाला हे जाणून धक्का बसेल की पेटीएमने मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंट (डिजिटल वॉलेट) वर अतिरिक्त पैसे कमावण्यास सुरुवात केली आहे. लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे सर्व युजर्ससोबत असे घडले नाही. परंतु काही युजर्सनी मात्र तक्रार केली की, त्यांच्या बिल पेमेंटवर अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे.

वाचा: खूप खर्च न करता खरेदी करा ब्रँडेड Smart TV, Flipkart वर येतोय जबरदस्त सेल, पाहा ऑफर्स आणि सेल डेट

पेटीएम आता मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी आपल्या युजर्सकडून सुविधा शुल्क आकारत आहे. यानंतर युजर्सनी मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर नाराजी व्यक्त केली आहे. मात्र या मुद्द्यावर कंपनीकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. .महत्वाचे म्हणजे, २०१९ मध्ये पेटीएमने युजर्सना सूचित केले होते की, ते कोणत्याही व्यवहारावर सुविधा शुल्क आकारत नाही आणि कधीही आकारणार नाही. मात्र, ही सुविधा केवळ वॉलेट, यूपीआय आणि कार्ड पेमेंटवर उपलब्ध असेल, असेही कंपनीने स्पष्ट केले होते. यामध्ये पेटीएम पोस्टपेडचा समावेश नाही.

वाचा: Smartwatch: ब्लूटूथ कॉलिंगसह Noise ColorFit Pulse Buzz भारतात लाँच, वॉचमध्ये ७ दिवसांपर्यंत बॅटरी लाईफ

९१ मोबाईलच्या रिपोर्टनुसार, काही युजर्सनी ट्विटरवर तक्रार केली आहे की पेटीएमद्वारे मोबाईल रिचार्ज आणि बिल पेमेंटसाठी सुविधा शुल्क आकारत आहे. यासोबतच काही युजर्सनी पेटीएमच्या त्या जुन्या ट्विटचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे, ज्यामध्ये सुविधा शुल्क न घेण्याबाबत बोलले आहे. एका यूजरने सांगितले की, डीटीएच रिचार्जवर त्याला २ रुपये अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. यानंतर पेटीएम सपोर्टने ते तपासण्यासाठी यूजरकडून काही तपशील मागवले आहेत.

वाचा: Smartphone Sale: पहिल्याच सेलमध्ये Realme चा ‘हा’ धमाकेदार स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह खरेदी करा, फोनमध्ये मिळणार भन्नाट फीचर्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.