नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पेटीएम पेमेंट्स बँकेवर मोठी कारवाई करत निर्बंध लावले आहेत. अनुपालन समस्यांमुळे केंद्रीय बँकेने पेटीएम पेमेंटला नवीन ग्राहक जोडण्यापासून बंदी घातली असून रिझर्व्ह बँकेने ३१ जानेवारी रोजी याबाबत आदेश जारी केला. यासोबत २९ फेब्रुवारीनंतर सध्याच्या ग्राहकांच्या खात्यात रक्कम जमा करणे थांबवण्याचे आदेशही आरबीआयने कंपनीला दिले, परंतु विद्यमान ग्राहकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. पेटीएमच्या कोणत्याही सेवेत त्यांच्याकडे पैसे पडून असतील तर ते पैसे संपेपर्यंत त्यांना वापरण्याची सुविधा मिळाले ज्यासाठी कोणतीही मुदत देण्यात आलेली नाही.

केंद्रीय बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की सिस्टम ऑडिट अहवाल आणि त्यानंतर संकलन प्रमाणीकरण अहवालातून दिसून आले की कंपनीने सातत्याने अनुपालन मानकांचे उल्लंघन केले. याशिवाय, पेटीएम बँकांशी संबंधित अनेक त्रुटी समोर आल्या ज्यामुळे भविष्यात त्यांच्यावर आणखी आवश्यक कारवाई केली जाईल.

Union Budget 2024: बजेटच्या एक दिवस सरकारने दिली आनंदाची बातमी… सर्व प्रकारचे स्मार्टफोन स्वस्त होणार
पेटीएमला दणका पण ग्राहकांना किंचित दिलासा
रिझर्व्ह बँकेने पेटीएमवर नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली ज्यामुळे ऍपचे यूजर्स (ग्राहक) चिंतेत आहेत. तथापि, आरबीआयने विद्यमान ग्राहकांना दिलासा देत म्हटले की पेटीएम पेमेंट्स बँकेचे विद्यमान ग्राहक त्यांच्या वॉलेटमध्ये असलेल्या रकमेचा पूर्णपणे वापर करू शकतात. पैसे बचत खाते, चालू खाते, प्रीपेड इन्स्ट्रुमेंट, फास्टॅग, नॅशनल किंवा कॉमन मोबिलिटी कार्डमध्ये असले तरीही त्याचा वापर केला जाऊ शकतो आणि यावर मुदतीचे कोणतेही बंधन नाही. म्हणजे सध्या तुमच्या पेमेंट खात्यात असलेले पैसे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणत्याही तारखेपर्यंत वापरू शकता परंतु २९ फेब्रुवारीनंतर यापैकी कोणत्याही सेवेत नवीन रक्कम जोडता येणार नाही.

Small Savings vs FD: गुंतवणुकीबाबत कन्फ्यूज आहात? जाणून घ्या तुमच्यासाठी गुंतवणुकीचा कोणता पर्याय सेफ अन् बेस्ट
२९ फेब्रुवारीनंतर ही सेवा बंद
पेटीएम पेमेंट्सवरील नवीन निर्बंध २९ फेब्रुवारीपर्यंत लागू होतील आणि यानंतर पेटीएम ग्राहकांच्या अकाऊंट, वॉलेट, प्रीपेड इंस्ट्रूमेंट्स, फास्टटॅग, NCMC कार्डमध्ये ना पैसे डिपॉझिट होतील, ना क्रेडिट व्यवहार होऊ शकतील. पण ग्राहक खात्यात असणारा बॅलेन्स संपेपर्यंत सुविधांचा लाभ घेऊ शकतात.

Budget 2024: निर्मला सीतारामन कधी, किती वाजता सादर करणार अर्थसंकल्प? जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
२९ फेब्रुवारी २०२४ नंतर पेटीएम वापरकर्त्यांना यूपीआय आणि BBPOU (भारत बिल पेमेंट ऑपरेटिंग युनिट) सारख्या सेवा वगळता इतर कोणत्याही सेवेचा लाभ मिळणार नाही. मध्यवर्ती बँकेने PPBL ला १५ मार्च २०२४ पर्यंत वेळ दिला असून या कालावधीत सर्व प्रलंबित व्यवहार आणि नोडल खाती सेटल करावी लागतील.

Read Latest Business NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *