मुंबई : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरमसाठ पैसा कमावता येतो. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी अनेक शेअर्स आहेत, यापैकी काहींची किंमत जास्त तर काही शेअर्स अगदी सामान्यांना परवडणारे असतात. अशा कमी किंमतीच्या शेअर्सना पेनी स्टॉक्स म्हणूनही ओळखले जाते. आजच्या काळात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत जात आहे. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची प्रक्रियाही सोपी असून येथे गुंतवणूक करण्याचे अनेक पर्याय आहेत. लार्जकॅप, मिडकॅप, स्मॉलकॅप म्युच्युअल फंडाव्यतिरिक्त पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकतो. परंतु पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

टाटांच्या छुपा रुस्तम शेअरने गुंतवणूकदारांना लॉटरी, केली छप्परफाड कमाई; BUY करण्याची हीच संधी?
पेनी स्टॉक म्हणजे काय?
शेअर बाजारात गुंतवुकीसाठी अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत ज्यांची किंमत १० रुपयापेक्षाही कमी आहे. बाजाराच्या बोली भाषेत यांना पेनी स्टॉक म्हणतात. तथापि, पेनी स्टॉकची कोणतीही निश्चित व्याख्या नाही. तुम्हाला बाजारात मोठी रक्कम गुंतवायची नसेल तर पेनी स्टॉक तुमच्यासाठी फायदेशीर पर्याय ठरू शकतो. पण लक्षात घ्या की पेनी स्टॉकमधील गुंतवणूक खूप धोकायक ठरू शकते. बाजारातील व्यवहार चढ-उताराच्या अधीन असतात, म्हणजे जे एखादा गुंतवणूकदार श्रीमत बनू शकतो, तर त्याला नुकसानही होऊ शकते.

अशा परिस्थिती, पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर अत्यंत सावधपणे गुंतवणूक करावी. संक्षिप्त माहिती घेतल्यानंतरच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा. घाईघाई किंवा कोणाच्या प्रभावाखाली गुंतवणूक केल्यास मोठं नुकसानही सहन करावं लागू शकतं. एकूणच पेनी स्टॉकची किंमत कमी असली तरी तुम्ही सोयीनुसार गुंतवणूक करा.

आधी आपटला मग सुस्साट धावतोय, एनर्जी शेअर खरेदीसाठी झुंबड; तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना या गोष्टी लक्षात ठेवा

तुम्ही कधीही अपर किंवा लोअर पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करू नये. जर तुम्ही असा पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक केली तर ते विकताना अडचणीला सामोरे जावे लागू शकते.

पेनी स्टॉकमध्ये किंमत पाहून कधीही गुंतवणूक करू नये. अनेक गुंतवणूकदार स्वस्त स्टॉक म्हणून गुंतवणूक करतात ज्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत, पेनी स्टॉकमध्ये जास्त परतावा मिळण्याची संधी असेल तिथेच आपल्या कष्टाची कमाई गुंतवावी.

पेनी स्टॉकची खरेदी-विक्री करताना कधीही लोभाला बळी पडू नये. तुम्ही पेनी शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे आणि तुम्हाला अपेक्षित नफा मिळत असेल, तर तुम्ही खरेदी करावा. पण जर तुम्हाला जास्त फायद्याची अपेक्षा असेल तर तुमचे नुकसान देखील होऊ शकते.

खरेदीनंतर संयम पाळणाऱ्यांना टाटांचा शेअर करेल मालामाल, स्टॉक खरेदीसाठी स्पर्धा; तुम्ही घेणार का?
– कोणत्याही पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनी आणि त्यांची आर्थिक परिस्थिती माहिती करून घ्या. कंपनीचे चार्ट सकारात्मक असेल तरच गुंतवणूक करा.

– पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही तज्ञांचा सल्ला देखील घ्या.

Read Latest Business NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *