मुंबई-राखी सावंत म्हणजे बॉलिवूडमधील धमाका. सतत काही ना काही बिनधास्त बोलून राखी तिच्या चाहत्यांचे कान आणि डोळे तिच्याकडे वळवण्यात बाजी मारते. कधी मजेशीर व्हिडिओ तर कधी हॉट फोटो शेअर करत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या राखी सावंतची कायमच चर्चा असते. राखीचा बॉयफ्रेंड, तिचं लग्न, आणि ब्रेकअप यावरही तिचं बोलणं बिनधास्त असतं.

Video: सारा अली खानला पाहिल्यावर कार्तिकने मारली घट्ट मिठी

गेल्या काही दिवसांपासून राखी आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल दुरानी यांच्या रिलेशनशीपची चर्चा आहे. तर तिचा पहिला नवरा रितेश सिंगवर राखीने आरोप केल्यानेही तिचं खाजगी आयुष्य चर्चेत आलं होतं. त्यामुळेच आता राखीच्या आयुष्यात काय घडतंय याची चाहते वाट बघत असतात. त्या चाहत्यांसाठी राखीने गुड न्यूज दिली आहे.


नुकताच राखीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. इन्स्टाग्राम पेजवरील हा व्हिडिओ तिने खास शूट केला आहे. राखीने दुबईमध्ये एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. गुलाबी रंगाची साडी नेसून राखी तिचं दुबईतील आलिशान घर चाहत्यांना दाखवत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसतय. ये तेरा घर ये मेरा घर असं गाणं म्हणतच राखीनं स्वागत केलं आहे.

हॉल, बेडरूम आणि किचन असा हा राखीचा फ्लॅट फुल्ल फर्निश आहे. त्यामुळेच घराची टूर करत असताना राखी असं म्हणतेय की, बस्स, बॅग भरायची आणि इथं येऊन रहायचं असा हा फ्लॅट आहे. फुल्ल फर्निश असल्याने सगळ्या सुविधा या घरात आहेत. हे देवा, आता तुझ्याकडे मागण्यासाठी काहीच नाही आता, मला सगळं मिळालं, दुबईत घर असावं हे स्वप्नंही पूर्ण झालं.


‘क्या आप मेरा दुबई का घर देखना चाहेंगे असं म्हणत राखीने तिच्या चाहत्यांसाठी संपूर्ण घराचा नजारा दाखवला आहे. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत असून राखीच्या चाहत्यांनी तिचं अभिनंदन केलं आहे. हॉल दाखवल्यानंतर राखीने बेडरूमकडे मोर्चा वळवला. माझी बेडरूम बघून तुम्हाला धक्काच बसेल इतकी बेडरूम सुंदर आहे असंही वर्णन राखीने केलं. किचनचीही सफर राखीने घडवली आहे.

आई कुठे काय करते : वडाला फेऱ्या मारताना संजनाचा धागाच तुटला, Video झाला Viral

काही दिवसांपूर्वी राखीने तिच्या नव्या बीएमडब्ल्यूकारचा व्हिडिओ शेअर केला होता. बिग बॉसच्या १४ व्या सीझनमध्ये राखी फायनलिस्टमध्ये होती, पण १४ लाख रुपये घेत ती शोमधून बाहेर पडल्याचे पाहून तिचे चाहते आणि बिग बॉसचे प्रेक्षक हैराण झाले होते. पण त्यावेळी तिला पैशांची गरज असल्याचं तिनं सांगितलं होतं. आईच्या आजारपणासाठी पैसे हवे असल्यानं तो निर्णय घेतल्याचं तिनं स्पष्ट केलं होतं. आता राखीने थेट दुबईत घर खरेदी केल्याचं पाहून तिचे चाहते खुश आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.