सातारा: माण तालुक्यातील मोगराळेजवळ शीतल ढाब्याजवळ इंडिका कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात एक तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. हे दोघे मित्र क्रिकेट खेळून मोटारसायकलवरून घरी चालले होते. ही घटना रात्री सात वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. ऋषिकेश जगदाळे (वय २८) असे तरुणाचे नाव आहे. ऐन दिवाळीत ही घटना घडल्याने मोगराळे गावावर शोककळा पसरली आहे.

याबाबत घटनास्थळ आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपावलीनिमित्त क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी संघाबरोबर ऋषिकेश जगदाळे आणि त्याचा मित्र विक्रम सावंत हे मोटारसायकलवरून क्रिकेट खेळण्यासाठी गेले होते. सायंकाळी सातच्या सुमारास ते क्रिकेट खेळून घरी परतत असताना मोगराळेजवळ असणाऱ्या पाचवड फाट्याजवळ शीतल ढाब्यासमोर मोटारसायकलला (एमएच ११ सीपी ७५११) भरधाव कारने (एमएच १२ जीबी ८०९५) भीषण धडक दिली. कारचालक ओमकार सुभाष गुंजवटे (रा. गोंदवले बुद्रुक) फलटणहून येत होते. यावेळी मोगराळेजवळ असणाऱ्या पाचवड फाट्याजवळ शीतल ढाब्यासमोर आले असता हा भीषण अपघात घडला.

गर्लफ्रेण्डसोबत बोलताना चार्जिंग संपली, मोबाइल चार्ज करता करता बोलत होता, तेवढ्यात स्फोट अन्…
या अपघातात मोटारसायकलवरील ऋषिकेश जगदाळे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र विक्रम सावंत (रा. मोगराळे) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी विक्रम याच्यावर बारामती येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच दहिवडी पोलिस ठाण्यातील पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

ऋषिकेश जगदाळे हा गुजरात येथील कलमार पोर्ट येथे नोकरीला होता. दीपावली सणासाठी गावी मोगराळे येथे आला होता. त्याचे सहा महिन्यांपूर्वीच त्याच्या नात्यातील मुलीशी विवाह झाला होता. दीपावलीच्या दिवशी घटना घडल्याने शांत स्वभाव असलेल्या ऋषिकेशच्या निधनाने मोगराळे गावावर शोकळला पसरली आहे. रात्री शवविच्छेदन केल्यानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्यावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

या अपघाताची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली आहे. अपघाताची फिर्याद संतोष सावंत यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदकुमार खाडे अधिक तपास करत आहेत.

५० रुपयांत गोल्डन थाळीचा मोह ३८ हजारांना पडला, पाच महिन्यांनी आरोपींना अहमदाबादमधून अटक
Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *