परभणी: परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पिंपरी येथे एका ६९ वर्षीय महिलेच्या डोक्यात वीट घालून तिचा निर्घृण खून केल्याची घटना घडली होती. या घटनेला आता वेगळेच वळण मिळाले आहे. प्लॉट विकण्यासाठी आई अडसर ठरत असल्याने पोटच्या मुलाने आईच्या डोक्यात आणि कपाळावर वीट मारून खून केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. मारोती शंकरराव सोनटक्के असे खून करणाऱ्या मुलाचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पूर्णा तालुक्यातील पिंपरी येथील मारोती शंकरराव सोनटक्के (वय ३८) वर्ष यांचा त्यांच्या आई सुलोचनाबाई शंकरराव सोनटक्के यांच्यासोबत प्लॉट विक्री करण्याच्या कारणावरुन नेहमीच वाद होत होता.

हेही वाचा –मध्यरात्री रेल्वे स्थानकावर घेऊन फिरला, मग मैदानात नेऊन महिलेला संपवलं, परभणीत थरार

सुलोचनाबाई सोनटक्के घरातील छपरामध्ये बाजेवर झोपल्या असताना बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांचा मुलगा मारोती सोनटक्के याने आई सुलोचनाबाई यांना झोपेतून उठवून घरातील चुलीजवळ ढकलून दिले. यावेळी मारोती सोनटक्के याने सुलोचनाबाई यांच्या डोक्यामध्ये आणि कपाळावर विटाने मारहाण करुन जखमी केले. यामध्ये सुलोचनाबाई यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा –अभ्यासाचा कंटाळा आला, रागाच्या भरात १४ वर्षीय विद्यार्थ्याने उचलले हे पाऊल

घटनेची माहिती मिळाल्यानंतर चुडावा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता. यावेळी कोणीतरी अज्ञात कारणाने त्यांचा खून केला असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पोटचा मुलगा आईचा मारेकरी निघाला आहे. याप्रकरणी चुडावा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिसांनी आरोपी मारोती सोनटक्के याला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा –VIDEO: आईने मोबाईल हिसकावून घेतला, १५ वर्षांच्या मुलाचा पारा चढला, अख्खं घर उद्ध्वस्त केलं

देशभरात एनआयएची मोठी कारवाई, कोल्हापुरातूनही १ जण ताब्यात; दहशतवादी कारवायांचा आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published.