PM नरेंद्र मोदी 19 तारखेला वर्ध्यात येणार:विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना मदत किट आणि मनी धनादेशाचे वाटप करतील

PM नरेंद्र मोदी 19 तारखेला वर्ध्यात येणार:विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना मदत किट आणि मनी धनादेशाचे वाटप करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ सप्टेंबर रोजी एक दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. वर्ध्यात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मदत किट आणि मनी धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे. वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदी नागपूरहून वर्ध्याला जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पहिल्यांदाच विदर्भात येत आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत ते वर्धा, रामटेक आणि चंद्रपूर येथे आले होते. त्या नंतरचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. विश्वकर्मा ही केंद्र शासनाची योजना आहे. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत लोहार, सोनार, चांभार, न्हावी, धोबी अशा १४० जातींना फायदा होणार आहे . या योजनेमध्ये कर्ज , प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र तसेच औजार खरेदी साठी १५ हजार रुपये पण मिळतील. आतापर्यत २ कोटी २७ लाखांपेक्षा अधिक लोकांनी अर्ज केले आहे. यासाठी १३ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत भाजप नेते आणि अधिकारीही सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला विदर्भापासून सुरूवात झाली होती. कन्हान येथील जाहीर सभेला पंतप्रधानांनी संबोधित केले होते. नागपुरात मतदानाच्या रात्री त्यांनी राजभवनात मुक्काम केला होता. लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम रेशमबाग मैदानावर पार पडला. वर्ध्याच्या कार्यक्रमाने भाजप राज्यातील निवडणुकीच्या कामाला गती देईल, असे मानले जात आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड १५ रोजी शहरात उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे १५ सप्टेंबरला शहरात येणार आहेत. कॉलेजच्या एका कार्यक्रमात ते उपस्थित राहाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाची नियोजन बैठक होणार आहे.

​पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ सप्टेंबर रोजी एक दिवसीय विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. वर्ध्यात आयोजित कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान पहिल्यांदाच विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थ्यांना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मदत किट आणि मनी धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे. वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान मोदी नागपूरहून वर्ध्याला जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी पहिल्यांदाच विदर्भात येत आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत ते वर्धा, रामटेक आणि चंद्रपूर येथे आले होते. त्या नंतरचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. विश्वकर्मा ही केंद्र शासनाची योजना आहे. १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत लोहार, सोनार, चांभार, न्हावी, धोबी अशा १४० जातींना फायदा होणार आहे . या योजनेमध्ये कर्ज , प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र तसेच औजार खरेदी साठी १५ हजार रुपये पण मिळतील. आतापर्यत २ कोटी २७ लाखांपेक्षा अधिक लोकांनी अर्ज केले आहे. यासाठी १३ हजार कोटींची तरतुद करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत भाजप नेते आणि अधिकारीही सक्रिय झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला विदर्भापासून सुरूवात झाली होती. कन्हान येथील जाहीर सभेला पंतप्रधानांनी संबोधित केले होते. नागपुरात मतदानाच्या रात्री त्यांनी राजभवनात मुक्काम केला होता. लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम रेशमबाग मैदानावर पार पडला. वर्ध्याच्या कार्यक्रमाने भाजप राज्यातील निवडणुकीच्या कामाला गती देईल, असे मानले जात आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड १५ रोजी शहरात उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे १५ सप्टेंबरला शहरात येणार आहेत. कॉलेजच्या एका कार्यक्रमात ते उपस्थित राहाणार आहेत. त्यांच्या दौऱ्याबाबत प्रशासनाची नियोजन बैठक होणार आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment