पोलिसांना यश – १२ तासांच्या आत कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या:परिसरात काढली धिंड, चार अल्पवयीनांचा समावेश

पोलिसांना यश – १२ तासांच्या आत कोयता गँगच्या आवळल्या मुसक्या:परिसरात काढली धिंड, चार अल्पवयीनांचा समावेश

येथील सद्गुरूनगर परिसरात शनिवारी (दि. २१) रात्रीच्या सुमारास हातात कोयता नाचवत नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्यांच्या अवघ्या बारा तासांच्या आत मुसक्या आवळण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे. संशयितांमध्ये एका २१ वर्षीय युवकासह चार अल्पवयीनांचा समावेश आहे. रविवारी त्यांची त्याच परिसरात धिंड काढली. सातपूर येथील सद्गुरूनगर परिसरात शनिवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास सहा ते सात टवाळखोरांनी एका युवकाला मारण्याच्या हेतूने सद्गुरूनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला होता. मात्र तो युवक मिळून न आल्याने त्यांनी हातात कोयते नाचवत अपार्टमेंटमधल्या घरांच्या काचा फोडत दहशत माजवत सातपूर पोलिसांनी खुले आव्हान दिले होते. दरम्यान, सातपूर पोलिसांनी तपासचक्र गतिमान करत संशयितांचा शोध सुरू केला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिस अमलदार सागर गुंजाळ व भूषण शेजवळ यांना संशयितांची गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी आनंदवल्ली परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित कोयता गँग आनंदवल्ली परिसरात येताच सातपूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. यात महेश गोकुळ सोनवणे (२१, रा. कामगारनगर) यांच्यासह चार अल्पवयीन ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राकेश न्याहाळदे, उपनिरीक्षक राहुल नळकांडे, दीपक खरपडे, अनिल आहेर यांच्या पथकाने कारवाई केली.

​येथील सद्गुरूनगर परिसरात शनिवारी (दि. २१) रात्रीच्या सुमारास हातात कोयता नाचवत नागरिकांमध्ये दहशत माजवणाऱ्यांच्या अवघ्या बारा तासांच्या आत मुसक्या आवळण्यात सातपूर पोलिसांना यश आले आहे. संशयितांमध्ये एका २१ वर्षीय युवकासह चार अल्पवयीनांचा समावेश आहे. रविवारी त्यांची त्याच परिसरात धिंड काढली. सातपूर येथील सद्गुरूनगर परिसरात शनिवारी रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास सहा ते सात टवाळखोरांनी एका युवकाला मारण्याच्या हेतूने सद्गुरूनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला होता. मात्र तो युवक मिळून न आल्याने त्यांनी हातात कोयते नाचवत अपार्टमेंटमधल्या घरांच्या काचा फोडत दहशत माजवत सातपूर पोलिसांनी खुले आव्हान दिले होते. दरम्यान, सातपूर पोलिसांनी तपासचक्र गतिमान करत संशयितांचा शोध सुरू केला. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिस अमलदार सागर गुंजाळ व भूषण शेजवळ यांना संशयितांची गोपनीय माहिती मिळाली असता त्यांनी आनंदवल्ली परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित कोयता गँग आनंदवल्ली परिसरात येताच सातपूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. यात महेश गोकुळ सोनवणे (२१, रा. कामगारनगर) यांच्यासह चार अल्पवयीन ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक राकेश न्याहाळदे, उपनिरीक्षक राहुल नळकांडे, दीपक खरपडे, अनिल आहेर यांच्या पथकाने कारवाई केली.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment