मुंबई- लोकप्रिय मल्याळम लेखक सतीश बाबू पैय्यानूर यांचं २४ नोव्हेंबर रोजी निधन झालं आहे. त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ५९ वर्षाचे होते. सतीश त्यांच्या राहत्या घरी मृत अवस्थेत आढळून आले. गुरुवारी तिरुवनंतपूरम येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये सतीश यांचा मृतदेह मिळाला आहे. २४ नोव्हेंबर रोजी त्यांची पत्नी माहेरी गेल्याने ते घरात एकटे होते. त्यानंतर त्यांनी फोन न उचलल्याने अधिक चौकशी करण्यात आली. मात्र दरवाजा ठोठावूनही त्यांनी दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडण्यात आला. परंतु, घरात सतीश मृत अवस्थेत पडलेले होते. त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाही मात्र पत्नी माहेरी गेल्यानंतर अचानक त्यांचा मृत्यू झाल्याने पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. ही घटना घडली तेव्हा दरवाजा आतून बंद होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश यांच्या मृत्यूचं कारण त्यांच्या शवविच्छेदनानंतरच कळू शकेल. त्यांच्या मृत्यूबद्दल शंका नसली तरी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सतीश यांचा मृतदेह तिरुवनंतपूरम येथील सरकारी वैद्यकीय इस्पितळातील शवाघरात ठेवण्यात आला आहे. त्यांचं शवविच्छेदन २५ नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकेल.

कोण होते सतीश बाबू?
सतीश बाबू पैय्यानूर यांचा जन्म पलक्कड येथील पाथीरीपाला येथे झाला. कान्हागड आणि पय्यन्नूर येथून त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. विद्यार्थीदशेपासूनच ते साहित्यिक कार्यात गुंतले होते. प्रसिद्ध लघुकथा लेखक आणि कादंबरीकार सतीश बाबू यांना २०१२ साली केरळ साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आल होतं.

याशिवाय त्यांनी केरळच्या सांस्कृतिक विभागांतर्गत भारत भवन या संस्थेचे सदस्य सचिव म्हणूनही काम केलं आहे. ते अनेक कादंबऱ्यांचे लेखकही आहेत. त्यांनी मन्नू, देवापुरा, मांजा सूर्यांते नलुकल आणि कुदामणिकल किलुंगिया राविल यांचा समावेश आहे. त्यांना मलायत्तूर पुरस्कार आणि थोप्पिल रवी पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *