म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर पडलेली फूट तसेच अलिकडेच राज्यात झालेले सत्तांतर या पार्श्वभूमीवर यंदा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा पार पडणार आहे. त्याच्या तयारीचाच भाग म्हणून शिवसेनेचे एक पोस्टर प्रसिद्ध झाले आहे. ‘आता आतुरता उद्धवसाहेबांच्या गर्जनेची’ असे लिहिलेले पोस्टर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर फूट पडली असून ४० आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटात राज्यावर सत्तेत आले. तसेच शिंदे गटाने मूळ शिवसेना पक्षावर दावा केला आहे. यानंतर आता शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावाही आपल्या पद्धतीने घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गेली अनेक वर्षे शिवसेनेचा शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा पार पडतो. मात्र यावेळी तिथे उद्धव ठाकरे यांचा मेळावा होणार की शिंदे गटाचा, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, तरीही शिवसेनेने शिवाजी पार्कमध्येच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे.

बीकेसी येथील मैदानात मेळावा घेण्यासाठी एमएमआरडीएने शिंदे गटाला परवानगी दिली असली तरी शिवाजी पार्कमध्ये नेमकी कोणाला परवानगी मिळणार, याबाबत मुंबई महापालिकेने अद्याप निर्णय घेतलेला नाही. अशावेळी शिवसेनेने मेळाव्याची तयारी सुरू करताना सोशल मीडियाचाही आधार घेतला आहे. शिवसेनेचे एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर ‘आता आतुरता उद्धवसाहेबांच्या गर्जने’ची असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.