[ad_1]

नवी दिल्ली : दरवर्षी देशातील कोट्यवधी पेन्शनधारकांनी जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असून यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबरचा महिना निश्चित केला आहे. सर्व सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. कारण त्यानंतरच त्यांची पुढील पेन्शन सुरू राहते. मात्र, काही काळापूर्वी केंद्र सरकारने ८० वर्षांवरील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक महिना अगोदर पैसे जमा करण्याची मुभा दिली म्हणजेच १ ऑक्टोबरपासून ते जीवन प्रमाणपत्र सादर करू शकतात.

दरवर्षी मोठ्या संख्येने केंद्र सरकारचे पेन्शनधारक बँकांमध्ये जीवन प्रमाणपत्र सादर करतात, पण आजच्या डिजिटल काळात तुम्ही तुमच्या सोयीनुसारही जमा करू शकतात. याशिवाय अशा काही पद्धतीही आहेत, ज्यामध्ये परदेशात राहूनही तुम्ही जीवन प्रमाणपत्र जमा करू शकता.

EPFO: 7 कोटी खासगी नोकरदारांना बसू शकतो मोठा झटका, पीएफ व्याजदर घटण्याचे संकेत; वाचा अपडेट
PPO क्रमांक खूप महत्त्वाचा
दरम्यान, इकॉनॉमिक टाईम्समध्ये प्रकाशित वृत्तानुसार पेन्शन प्राप्तकर्ते फक्त आधार क्रमांक, नाव, मोबाइल नंबर आणि पेन्शन पेमेंट ऑर्डरद्वारे आधार आधारित प्रमाणीकरणाच्या मदतीने जीवन प्रमाणपत्र सहजपणे सबमिट करू शकतात, परंतु अनेक वेळा लोक पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे PPO क्रमांक विसरतात. अशा परिस्थितीत त्यांना त्यांच्या पेन्शनची स्थिती तपासण्यापासून ते जीवन प्रमाणपत्र सादर करण्यापर्यंत समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

त्यामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) अंतर्गत कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेच्या निवृत्ती वेतनधारकाला १२ अंकी क्रमांक मिळतो, पण अनेक विसरभोळे हा नंबर विसरतात. तुम्हालाही तुमचा PPO नंबर आठवत नसेल आणि तो मिळवायचा असेल तर आम्ही तुम्हाला त्याची सोपी प्रक्रिया सांगत आहोत.

एकदाच पैसे गुंतवा अन् पेन्शन स्वरुपात मिळेल जबरदस्त रिटर्न्स; जाणून घ्या सविस्तर माहिती
PPO नंबर मिळवण्याचा सोपा मार्ग

  • सर्वप्रथम www.epfindia.gov.in ला भेट द्या.
  • पुढे ऑनलाइन सेवेवर जा आणि पेन्शनर पोर्टलवर क्लिक करा.
  • यानंतर येथे PPO क्रमांकावर क्लिक करा.
  • त्यानंतर येथे तुम्हाला पीपीओ क्रमांक जाणून घेण्यासाठी बँक खाते क्रमांक किंवा PF क्रमांक प्रविष्ट करा.
  • काही मिनिटांत तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर PPO क्रमांक आणि सदस्य आयडी टाकावा लागेल.

Explainer : नोकरदारांसाठी महत्त्वाचे! EPF खात्यातील माहिती अपडेट कशी करायची? जाणून घ्या स्टेप्स
डिजीलॉकर वरून PPO नंबर देखील मिळवू शकता

  • सर्वप्रथम तुम्ही https://digilocker.gov.in ला भेट द्या.
  • त्यानंतर UAN सर्व्हिसेस वर क्लिक करा आणि UAN नंबर टाका.
  • पुढे Get Documents वर क्लिक करा आणि पेन्शन प्रमाणपत्र निवडा.
  • ई-पीपीओची यादी पुढे उपलब्ध असेल. आता डाउनलोड पर्यायावर क्लिक करा आणि सहजपणे पीपीओ क्रमांक मिळवा.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *