प्रणिती शिंदेंचा लाडकी बहीण योजनेवर खोचक टोला:नवरा पगार आणून देतो तरी त्याचे कोणी ऐकत नाही, मग सरकारचे कोण ऐकणार?
कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे इंदिरा महोत्सव आयोजित केला होता. यावेळी कॉंग्रेस नेत्या प्राणिती शिंदे देखील उपस्थित होत्या. या महोत्सवात बोलताना प्राणिती शिंदे यांनी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर खोचक टीका केली आहे. नवरा सगळा पगार देतो, त्याचे बायको ऐकत नाही तर यांचे कोण ऐकणार? असा टोला त्यांनी लगावला आहे. प्राणिती शिंदे म्हणाल्या, लाडकी बहीण उद्या सावत्र होईल याची खात्री नाही. म्हणूनच ते निवडणुका घेत नाहीत. नवरा सगळा पगार देतो, त्याचं ऐकत नाही तर यांचे कोण ऐकणार? असा टोला त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवरून लगावला आहे. महिलांमध्ये दैवी शक्ती प्राणिती शिंदे म्हणाल्या, महिला आपल्या ताकदीचा वापर कमी करतात. महिलांमध्ये दैवी शक्ती असते. म्हणून त्या बाळाला जन्म देतात. मात्र अन्याय झाला तर आपण आपल्या शक्तीचा वापर करत नाही. ज्यावेळी बालकांवर अत्याचार होतात तेव्हा विचार करण्याची वेळ येते. आपण देखील मुलींना घरी सल्ले देतो. मुलांना काही सांगत नाही. मुलांना देखील समजावून सांगा. हे बदललं तर अत्याचार कमी झाल्याशिवाय राहणार नाही. गणपती घरात येतो तो मुलगाच घेतो. आता मुलींना देखील त्याच्या बरोबर उभं करा, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. कॉंग्रेसच्या काळात महिलांवरील अत्याचार कमी मी सोळा वर्षापासून राजकारणात आहे. महिलांमध्ये मोठी ताकद आहे ती व्यर्थ घालवू नका. काँग्रेसच्या काळात महिलांवर होणारे अत्याचार कमी होते. मात्र आता विकृत मानसिकता वाढत चालली. कारण सत्ताधारी आरोपींना पाठीशी घालतात. हे महिलांकडे वस्तू म्हणून बघतात. म्हणून अत्याचार वाढत चालले आहेत. सोनिया गांधींनी आपल्याला आरक्षण दिले प्रवास करताना आम्हालाच खासदार असून सुरक्षित वाटत नाही तर सामान्य महिलांचे काय? महिला म्हणून जन्माला येणं हीच मोठी जबाबदारी आहे. सोनिया गांधींनी आपल्याला आरक्षण दिले. मात्र 50 टक्क्यांसाठी आपण भांडतो. हे विकृत लोक ते मंजूर करत नाही. राजीव गांधींनी सोनिया गांधीचे ऐकले नाही आणि त्यादिवशी राजीव गांधी यांची हत्या झाली. परिस्थितीवर मात करून सोनिया गांधी पुढे आल्या. त्यांच्यामुळे आज आमच्या सारख्या महिला पुढे आल्या, असेही प्राणिती शिंदे म्हणाल्या. संगमनेर माझ्यासाठी घरच आहे प्राणिती शिंदे महोत्सवाविषयी बोलताना म्हणाल्या, मी आमदार, खासदार झाले मात्र महिलांसाठी एवढा मोठा कार्यक्रम मी सुद्धा करू शकले नाही. संगमनेरला आल्यावर घरी आल्यासारखं वाटतं. सोलापूर माझं गाव असलं तरी संगमनेर माझ्यासाठी घरच आहे.गृहिणी खूप हुशार आहेत. मात्र त्यांच्या उत्पादनांना मार्केट आता उभे राहिले आहे. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महिला एकत्रित आल्या तर शक्तीपीठ निर्माण होतं, असे त्या यावेळी म्हणाल्या.