घटस्फोटाची तयारी, पण शेवट गोड:छत्तीसगडच्या महिला जज करून देतात सप्तपदीचे स्मरण

छत्तीसगडच्या बेमेतरा कौटुंबिक न्यायालयात आजकाल आगळे वातावरण असते. घटस्फोटासाठी आलेली दांपत्ये सोबत राहण्याच्या आणाभाका घेऊन परतू लागली आहेत. न्यायाधीश नीलिमा सिंह बघेल यांच्या समुपदेशनाच्या अनोख्या पद्धतीने ५० हून जास्त दांपत्यांचा काडीमोड टळला. त्यांनी यापुढे प्रेमाने सोबत राहण्याचा संकल्प केला आहे. न्यायाधीश बघेल घटस्फोटाच्या प्रकरणात परंपरेचा आधार घेतात. सप्तपदी किंवा विवाहावेळी म्हटल्या गेलेल्या सात वचनांचे स्मरण करून देतात. त्यांच्या या प्रयत्नातून २१ सप्टेंबरला झालेल्या लोकअदालतीमध्ये डझनभर प्रकरणांचा असाच गोड शेवट झाला. सर्वोच्च न्यायालयाने पती-पत्नीमधील घटस्फोटासाठी सहा महिन्यांचा कूलिंग पीडियडचा नियम तयार केला आहे. म्हणजे दाम्पत्यास विचार करण्यासाठी किंवा आपसातील मतभेद दूर करण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी दिला जातो. आता कनिष्ठ न्यायालयांत व उच्च न्यायालयांत मध्यस्थता केंद्र बनवलेले आहेत. तेथे समेटाचे प्रयत्न केले जातात.
दांपत्याला सात वचनांची फ्रेम भेट म्हणून देतात बेमेतराच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीश नीलिमा सिंह यांनी न्यायालयाच्या भिंतींवर सात वचनांची एक फ्रेम लावलेली आहे. दांपत्यांना जज या सात वचनांची आवृत्ती करण्याचा आग्रह करतात, जेणेकरून त्यामुळे पती-पत्नीला परस्परांविषयी, मुलांबद्दल आणि कुटुंबाविषयीच्या जबाबदारीचे स्मरण होईल. नीलिमा म्हणाल्या, सप्तपदी संस्कृतमध्ये असते. विवाहाप्रसंगीच्या या वचनांची आठवण बहुतांश लोकांना नसते. म्हणूनच हिंदीत अनुवाद करून त्याची फ्रेम त्या भेट देतात.म्हणजे जबाबदारीची जाणीव त्यांना सदैव राहील.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment