देवी दाक्षायणी मंदिरात 9 दिवसांच्या उत्सवाची तयारी पूर्ण:आता रांगेतील भाविकालाच मिळणार थेट पूजेचा सन्मान
मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासूरगाव येथील कुलस्वामिनी श्रीदेवी दाक्षायणी मातेचे शिवना नदीच्या काठावर दाक्षायणी देवीचे भव्य मंदिर वसलेले आहे. मंदिरात पहाटे ५, दुपारी १२.३० तर सायंकाळी ७.३० वाजता आरती होते. या आरतीचा मान आता पुढारी, नेते किंवा मान्यवरांऐवजी रांगेत त्या वेळी जो भाविक समोर असेल त्याला देण्याचा ठराव करण्यात आला आहे. यापूर्वी नेतेमंडळी आरतीला आली की रांगेत लोकांना तासभर ताटकळत थांबावे लागत होते. या प्रथेला यंदा फाटा देण्यात आल्याने भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वृद्ध व स्तनदा मातांसाठी मंदिराच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. यात जर मोठी रांग असेल वृद्धांना तासन्तास रांगेत न उभे राहता थेट दर्शन मिळणार आहे. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे. ३ ऑक्टोबर गुरुवारपासून या देवी दाक्षायणी मातेच्या नवरात्र उत्सवाला घटस्थापना व वस्त्र दररोज भाविकांसाठी फराळाची व्यवस्था पिण्याचे पाणी तसेच राहण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. या उत्सावामुळे मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर प्रशासनाकडून सीसीटीव्हीसह भाविकांच्या वाहनांसाठी वाहन तळ,स्वच्छतागृह स्वौच्छालय पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच पोलीस बंदोबस्त वीज कर्मचारी , आरोग्य विभाग या सर्व विभागांना उत्सव काळात अलर्ट राहण्याचे निर्देश वैजापूरचे तहसीलदार सावंत यांनी दिले आहेत. अलंकाराने प्रारंभ होणार आहे. येथील संपूर्ण नवरात्र उत्सव पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या अधिपत्याखाली मंडळाधिकारी रिता पुरी, तलाठी अनिल कानडे, मंदिरांचे व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे व संतोष शेलारसह कर्मचारी सज्ज आहेत.