मुंबई: अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत सोशल (Priya Bapat and Umesh Kamat) मीडियावर विशेष सक्रिय असणारे सेलिब्रिटी कपल आहे. ट्रेंडिग रील्स, मजेशील व्हिडिओ, क्रिएटिव्ह फोटोज इ. गोष्टी सोशल मीडियावर शेअर करुन प्रिया-उमेश नेहमी चाहत्यांचे मनोरंजन करत असतात, चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील अपडेट देत असतात. दरम्यान आता उमेशने शेअर केलेला एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. उमेशने हा व्हिडिओ प्रियाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला आहे. त्याने हा व्हिडिओ शेअर करताना ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको’ (Priya Bapat Birthday) असं कॅप्शन दिलं असून यात त्यांचा रोमँटिक अंदाज दिसतोय.

हे वाचा-प्रिया बारावीत असताना पडलेली उमेशच्या प्रेमात; लव्ह स्टोरीमध्ये ९ आणि १८ तारखा खास

दरम्यान या व्हिडिओमध्ये प्रिया-उमेश वेगवेगळ्या आउटफिटमध्ये दिसत आहेत. कधी सुट्टी एंजॉय करताना तर कधी सेटवरील फोटोशूट दरम्यान काढलेले छोटे-छोटे व्हिडिओ एकत्र करुन हे रील बनवलेले आहे. त्यात प्रिया-उमेशचा रोमँटिक किसही आहे. प्रियाच्या त्याचप्रमाणे या जोडीच्या चाहत्यांनी अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.


उमेशसोबत पहिल्यांदा रोमँटिक सीन करताना काय होती प्रियाची परिस्थिती?

प्रिया-उमेश यांनी २०११ साली लग्न केलं. त्यानंतर २०१३ साली त्याचा टाइमप्लीज हा सिनेमा आलेला. या सिनेमाचा चाहतावर्ग आजही आहे. उमेश-प्रियासोबतच या सिनेमात सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधवही आहेत. समीर विद्वांस दिग्दर्शित या सिनेमात प्रिया आणि उमेश नवरा-बायकोच्या भूमिकेत असून त्याचं एक रोमँटिक गाणंही शूट करण्यात आलं आहे. गाण्यामध्ये या जोडीची रोमँटिक आणि बोल्ड केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे.

हे वाचा-जेव्हा ‘पावनखिंड’च्या दिग्दर्शकाने मागितली अमोल कोल्हेंची माफी; नेमकं काय घडलं

त्यावेळी प्रियाने दिलेल्या विविध मुलाखतींमध्ये तिनं सांगितलं होतं की, तशा पद्धतीचं गाणं तिनं पहिल्यांदाच केलं होतं. या हॉट-रोमँटिक गाण्याचं शूटिंग जरी प्रियाला तिच्या नवऱ्यासोबत करायचं होतं, तरी त्यावेळी प्रिया काहीशी अस्वस्थ, काहीशी लाजल्यासारखी झाली होती. हा अनुभव वेगळाच असल्याचं ती म्हणालेली. कारण तिने अशा पद्धतीचं गाण उमेश किंवा कुणासोबतही केलं नव्हतं. प्रिया म्हणते की प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असते, आणि तशा पद्धतीच गाणं करण्याची पहिली वेळ उमेशबरोबर आल्याचाा तिला आनंद होता. उमेशबरोबर काम करताना ते शूट खूप सोपं झाल्याचं ती सांगते.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.