बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रासोबत मुलगी मालचे मेरी चोप्रा जोनससह न्यूयॉर्कला फिरायला गेली आहे. प्रियंका आणि मालतीचीही पहिली ट्रिप आहे. ग्लोबल आयकॉन ठरलेल्या प्रियंका चोप्राने नुकतंच न्यूयॉर्कमध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंबलीला संबोधित केलं. यावेळी महिला आणि मुलांच्या अधिकासोबतच वातावरणाच्या बदलावर देखील चर्चा केली. या चर्चेत सहभागी झाल्यानंतर प्रियंकाने लेक मालतीसोबत छान क्वालिटी टाईम घालवला. प्रियंका आपल्या लेकीबाबत खूप सतर्क आहे. ती तिच्या मुलीला काही गोष्टी ठरवून देणार नाही.

प्रियंकाची ही लेकीसोबतची पहिली ट्रिप आहे. प्रियंकाने यावेळी न्यूयॉर्क स्काय लाइनचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रियंकाने 8 महिन्याच्या मालतीचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघीही उंच बिल्डिंगच्या खिडकीवर बसून न्यूयॉर्कचं सौंदर्य अनुभवत आहेत. पालकांसाठी मुलांसोबतची पहिली ट्रिप ही कायमच खास असते. ही आणखी खास बनवण्यासाठी आणि याचे फायदे जाणून घ्या. (फोटो सौजन्य – Priyanka इंस्टाग्राम / टाइम्स ऑफ इंडिया)

प्रियंका चोप्राची इंस्टाग्राम पोस्ट

​प्रवासात प्रत्येकाला समृद्ध करतो

प्रवास हा प्रत्येकालाच समृद्ध करणारा असतो. मुलांसोबत जेव्हा आपण हा प्रवास करतो. तेव्हा बऱ्याच गोष्टी प्लान करून जातात. त्यामुळे नियोजनाची सवय लागते. मुलं लहान असेल तर त्याला आपल्या कुटुंबासोबतच इतर लोकांची ओळख होते. यामुळे ही मुलं बुजरी राहत नाहीत. तसेच प्रवास हा मुलांना देखील अनेक गोष्टी शिकवतो. प्रवासात कसं वागावं? अनोळखी लोकांशी कशी मैत्री करावी? या गोष्टी देखील मुलं प्रवासातून शिकत असतात. तसेच प्रवास करताना ते पालकांच निरीक्षण करत असतात. पालक गुगल मॅपचा कसा वापर करतात. किंवा प्रवास करताना काय काळजी घ्यावी. या सगळ्या गोष्टी मुलं शाळेत शिकत नाहीत.

​फ्लेक्सिबल असतो प्रवास

लहान मुलं जोपर्यंत शाळेत जात नाहीत तोपर्यंत तुम्ही त्यांना घेऊन कधीही प्रवास करू शकता. कारण एकदा मुलं शाळेत जायला लागली की, त्यांच्या शाळांच्या सुट्यांनुसार तुम्हाला प्रवास करावा लागतो. अशावेळी पर्यटनाच्या ठिकाणी लोकांची गर्दी असते. त्यावेळी मुलाला छान वेळ देता येत नाही. यापेक्षा मुलं थोडी टोडलर असतील तेव्हा घेऊन प्रवास करणे हा एक वेगळा अनुभव आहे. शातंता आणि फक्त तुमचा वेळ इतक्याच गोष्टी यावेळी महत्वाच्या असतात.

​प्रवासात वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख होते

प्रवास करत असताना वेगवेगळ्या संस्कृतीची ओळख मुलांना होते. ही ओळख त्यांना नव्याने समृद्ध करत असते. नवीन लोकं त्यांची बोलीभाषा, त्यातील वेगळेपण मुलांना येथे शिकायला मिळतात. मुलांची ही संस्कृती शिकण्याची सवय त्यांना भविष्यात कामी येते. तसेच प्रवासात मुलांना नवीन पाहण्याची आणि शिकण्याची सवय लागते. ज्यामुळे नवं काही तरी स्वीकारण्याची सवय त्यांच्या अंगवळणी होते. ही मुलं कोणत्याही बदलाचा स्वीकार कू शकतात.

​आठवणी जमा करतात

संपूर्ण जीवन हे खास आठवणींचा खजिना आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातील आठवणी जमा करणं हा एक वेगळा छंद असू शकतो. शब्दांपेक्षा चित्र जास्त लक्षात राहतात. त्यानुसारच मुलांचा प्रवास हा खूप चांगला लक्षात राहतो. प्रवासातील आठवणी त्यांना समृद्ध करू शकतात. या आठवणी त्यांना फक्त बालपणातच नाही तर अगदी मोठेपणी देखील समृद्ध करत असतात. पालकांसोबतच्या या सहली त्यांना त्यांच्या अधिक जवळ आणतात. मुलं आणि पालक यांच्यात एक वेगळं नातं निर्माण होतं.

आत्मनिर्भर होतात मुलं

प्रवास करत असताना मुलं कितीही लहान असलं तरीही त्यांच त्यांच एक जग असतं. त्याला ते स्वतःहून अनुभवायचं असतं. मुलांना प्रत्येक प्रवास नक्कीच आत्मनिर्भर करू शकतो. यात शंकाच नाही. तसेच मुलं दररोजच्या रुटीनपासून वेगळा अनुभव घेत असतात. तेव्हा त्यांना त्या सगळ्याचा आनंद मिळत असतो. बाहेर जो आहार मिळेल तो करावा लागतो. बाहेरच्या परिस्थितीशी आणि वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं.

(वाचा – मुलांवर प्रेम करताना ‘या’ चुका पडतील महागात, काही मुलं यामुळेच करतात पालकांचा टोकाचा तिरस्कार

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.