सिनेसृष्टीतील कलाकारांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरू असते. कधी त्यांच्या मालिका, सिनेमे तर कधी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल चाहते बोलत असतात. कलाकारांचे हटके फोटोही याचाच एकभाग. अनेकदा अभिनेत्रींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो आहे अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांचा . त्यांनी हा फोटो शेअर केल्यावर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलायख. तसंच त्यांना ओळखणंही कठिण जात असल्याचं म्हटलं आहे. सुप्रिया यांनी त्यांचा जुना, तरुणपणीचा फोटो शेअर केलाय. या फोटोत त्या खुपच सुंदर दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना सुप्रिया पाठारेंनी ‘सहज’ असं कॅप्शन लिहिलंय.
Source link
