धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याला विरोध:धुळे-सोलापूर महामार्गावर एकलव्य संघटनेचा रास्तारोको

धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याला विरोध:धुळे-सोलापूर महामार्गावर एकलव्य संघटनेचा रास्तारोको

धनगर समाज हा धनगड ह्या जमातीच्या नावाचा गैर फायदा घेत असून मोर्चे, आंदोलन, उपोषण करून धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी असंविधानिक मागणी ते करत आहेत. आदिवासी (अनु-जमाती) मध्ये कुणाचीही घुसखोरी न करणे व बिगर आदिवासींना आदिवासी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाज बांधवांनी कन्नड जवळील धुळे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर व धनगड एकच असलेल्या याचिकेवर सुनावणी केली असता धनगर ही जात असून धनगड ही जमात असल्याचे सांगत धनगर समाजाची याचिका फेटाळून लावली आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जीआर काढण्याचे सांगत महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा निर्णय घेतला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा एकलव्य संघटना सह महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटना ह्या आपण घेतलेल्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरतील व होणाऱ्या परिणामास आपले शासन जबाबदार राहील. तसेच पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणांमध्ये आदिवासी समाजाबद्दल जातीवाचक बेताल वक्तव्य करणाऱ्या पांडुरंग मैलगर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत अट्रॉसिटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, आदी मागणीचे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष पवन सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुनिल ठाकरे, परशुराम सोनवणे, बापू तळवाडे, राजू ठाकरे,
कडूबा पवार, लक्ष्मण माळी,किशोर पवार यांच्या सह आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.

​धनगर समाज हा धनगड ह्या जमातीच्या नावाचा गैर फायदा घेत असून मोर्चे, आंदोलन, उपोषण करून धनगर समाजाला आदिवासी मध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी असंविधानिक मागणी ते करत आहेत. आदिवासी (अनु-जमाती) मध्ये कुणाचीही घुसखोरी न करणे व बिगर आदिवासींना आदिवासी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये. तसेच धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करू नये या मागणीसाठी एकलव्य संघटनेचे अध्यक्ष पवन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाज बांधवांनी कन्नड जवळील धुळे-सोलापूर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. १६ फेब्रुवारी २०२४ रोजी मुंबई उच्च न्यायालयाने धनगर व धनगड एकच असलेल्या याचिकेवर सुनावणी केली असता धनगर ही जात असून धनगड ही जमात असल्याचे सांगत धनगर समाजाची याचिका फेटाळून लावली आहे. केवळ मतांच्या राजकारणासाठी मुख्यमंत्री यांनी धनगर समाजाला आदिवासीमध्ये समाविष्ट करण्यात येणार असल्याचे जीआर काढण्याचे सांगत महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या भावनेशी खेळणारा निर्णय घेतला आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, अन्यथा एकलव्य संघटना सह महाराष्ट्रातील सर्व आदिवासी संघटना ह्या आपण घेतलेल्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरतील व होणाऱ्या परिणामास आपले शासन जबाबदार राहील. तसेच पंढरपूर येथे सुरू असलेल्या धनगर समाजाच्या उपोषणांमध्ये आदिवासी समाजाबद्दल जातीवाचक बेताल वक्तव्य करणाऱ्या पांडुरंग मैलगर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत अट्रॉसिटी अक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, आदी मागणीचे शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष पवन सोनवणे, जिल्हाध्यक्ष सुनिल ठाकरे, परशुराम सोनवणे, बापू तळवाडे, राजू ठाकरे,
कडूबा पवार, लक्ष्मण माळी,किशोर पवार यांच्या सह आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थितीत होता.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment