नवी दिल्ली : BGMI Ban: गेमर्समध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला Battlegrounds Mobile India (BGMI) यापुढे Google Play Store आणि App Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध राहणार नाही .अहवालानुसार, सरकारच्या आदेशानंतर, या गेमवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. निश्चितपणे सांगता येत नसले तरी बीजीएमआय बंदी हे PUBG मोबाइलशी समतुल्य केले जाऊ शकते. ज्यावर गेल्या वर्षी त्याच्या चिनी मुळांमुळे बंदी घालण्यात आली होती. वृत्तानुसार, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी राज्यसभेत लेखी अहवाल सादर केला की, नवीन अवतारात बंदी घातलेले अॅप PUBG जे करत आहे तेच करत असल्याचे अहवाल आणि तक्रारी आहेत. त्यामुळे तपासासाठी त्याचा अहवाल मंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. बीजीएमआय ही PUBG मोबाइलची रीब्रँडेड आवृत्ती आहे.

वाचा: LED Bulb: सततच्या लोडशेडींगमुळे त्रस्त असाल, तर घरी आणा ‘हे’ इन्वर्टर बल्ब, किंमत कमी, बॅकअप जबरदस्त

BGMI वर बंदी का घालण्यात आली?

भारतात बीजीएमआयवर बंदी घालण्यामागे कोणतेही स्पष्ट कारण नाही. पण, नुकत्याच आलेल्या अहवालानुसार, PUBG सारख्या ऑनलाइन गेमवरून झालेल्या वादात १६ वर्षांच्या मुलाने आपल्या आईची गोळ्या घालून हत्या केली होती . या घटनेचा तपास सुरु आहे. Krafton Inc ने PUBG बंदी नंतर BGMI ला बाजारात सादर केले होते. ज्यामध्ये काही बदल झाले असले तरी त्यात PUBG चे फीचर्स देखील समाविष्ट होते आणि हे गेम काढून टाकण्याचे कारण असल्याचे मानले जात आहे.

वाचा: New Smartphone : नवीन स्मार्टफोन खरेदी करतांना ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष, मिळेल बेस्ट डील

PUBG New State डाउनलोड करू शकता:

BGMI अॅप मार्केटप्लेसमधून काढून टाकल्यानंतर क्राफ्टेनचा नवीन गेम PUBG New State अजूनही Google Play Store आणि App Store वर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. PUBG New State किंवा New State BGMI सारखाच गेमप्ले ऑफर करतो. पण, त्याचे ग्राफिक्स चांगले आहेत. हा गेम डाउनलोड करण्यासाठी, तुमच्याकडे किमान 4GB RAM आणि Android 6 वरील Android डिव्हाइस आणि iOS 13 किंवा उच्च ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करणारा iPhone असणे आवश्यक आहे.

PUBG वर बंदी का आली?

PUBG सोबतच सरकारने गेल्या वर्षी आणखी अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्याचबरोबर या अॅप्सवर बंदी घातल्यानंतर सरकारने या निर्णयामागे राष्ट्रीय सुरक्षेचे कारण असल्याचे सांगितले होते.

वाचा: Smartphone Price Cut: Xiaomi च्या ‘या’ शानदार स्मार्टफोनच्या किमतीत झाली कपात, फोन १७ मिनिटांत होतो फुल चार्जSource link

Leave a Reply

Your email address will not be published.