खामगावात ३०२ घरांत आढळली डास अळी:आरोग्य पथकाकडून डेंग्यूबाबत जनजागृती
आरोग्य पथकाच्या वतीने दि. २६ सप्टेंबर रोजी शहरातील विविध प्रभागांमध्ये कंटेनर सर्वेक्षण व डेंग्यू जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला. जिल्हा हिवताप अधिकारी चव्हाण, सहाय्यक जिल्हा हिवताप अधिकारी पांडे व होगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. खंडारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीलेश टापरे तसेच नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत शेळके, तालुका आरोग्य पर्यवेक्षक करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबवण्यात आला. या दरम्यान शहरातील विविध प्रभागांमध्ये आरोग्य पथकांकडून तीन हजार ३९५ घरांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३०२ ठिकाणी डास अळ्या आढळून आल्या. त्या नष्ट करून पथकाकडून रिकाम्या भांड्यांमध्ये पाणी न साचू देण्याबाबत तसेच डेंग्यू आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात आरोग्य निरीक्षक पागृत, बडे, खराटे, नितीन देशमुख, उन्हाळे, पायघन, मानवतकर, लाकडे, काटे, भोके, खामगाव नगर पालिकेचे आरोग्य निरीक्षक निळे, आरोग्य निरीक्षक राजपूत यांच्यासह खामगाव, शेगाव, नांदुरा तालुक्यातील आरोग्य सेवक, आरोग्य निरीक्षक, आशा सेविकांचा सहभाग होता.