प्रा. बनसोड यांच्या पुस्तकामुळे पुरोगामी चळवळीला गती मिळेल:‘महात्मा फुले आणि अस्पृश्यांची कैफियत’चे प्रकाशन
‘महात्मा फुले आणि अस्पृश्यांची कैफियत’मधून जे वास्तववादी लेखन वाचकांपुढे जात आहे. त्यामुळे निश्चितच पुरोगामी चळवळीला गती मिळेल, असे प्रतिपादन पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य सुधीर महाजन यांनी केले. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काँग्रेस नगर रोड स्थित सर्वोदय कॉलनीच्या संत रविदास सांस्कृतिक भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. महात्मा फुले यांचे नाव दिलेल्या या विचारपीठावर लेखक प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांच्यासह स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. उज्ज्वला मेहरे, मधुकरराव अभ्यंकर, समाजसेविका डॉ. राजिया सुलताना, सत्कारमूर्ती राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शरद गढीकर, प्रा. डॉ. संजय खडसे, प्रा.अरुण बुंदेले, सुरेश मेहरे, पोलिस पाटील कविता पाचघरे आदी उपस्थित होते. शिव-फुले-शाहू-आंबेडक रांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक चळवळीला गेल्या ५० वर्षांपासून गतिशील करणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांची ओळख आहे. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रा. श्रीकृष्ण बनसोड यांच्या ‘महात्मा फुले व अस्पृश्यांची कैफियत’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पाहुण्यांनी पुस्तकाविषयी आपले विचार व्यक्त केले. प्रकाशन समारंभाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संजय खडसे यांनी केले, तर आभार रजनी आमले यांनी मानले. प्रकाशन समारंभाला रसिकांची उपस्थिती होती. गुणवंतांसह विविध मान्यवरांचा सत्कार याप्रसंगी राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शरद गढीकर यांचा मैनाबाई बाबाराव बुंदेले स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक पुरस्कार – २०२४ देऊन त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करण्यात आला. याशिवाय ज्ञान स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल प्रा.डॉ. उज्वला मेहरे यांचा तर विविध स्पर्धांमधील यशाबद्दल कुंजल नीलेश, कीर्ती म्हसकर, अनंत वाडोकार, अर्चना वाडोकार, निरंजना भेले, माधुरी वाठ यांचाही सत्कार करण्यात आला. भारत सरकारतर्फे पेटंट मिळवणारे डॉ. दिनेश रोजतकर यांनाही पुरस्कृत करण्यात आले.