पुणे : पोलिसांची चलन कारवाई टाळण्यासाठी भलत्याच रिक्षाचा नंबर आपल्या रिक्षाला लावण्याचा ‘उद्योग’ करणाऱ्या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित रिक्षाचालकाने केलेला हा जुगाड बुधवारी (९ ऑगस्ट) सकाळी पोलिसांच्या निदर्शनास आला.

किरण पवाळ (रा. सम्राट चौक, वाकड) असे गुन्हा दाखल केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी सुशील किसनराव भंडलकर (वय ४०, रा. थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सेन्सर किटची मदत, अख्खे कुटुंब करायचे वाहनचोरी, पोलिसांनी आरोपींना ‘अशा’ ठोकल्या बेड्या!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या मालकीची ऑटो रिक्षा आहे. ती रिक्षा त्यांचे मित्र प्रीतम ननवरे चालवतात. २६ जुलैला सुशील यांना मोबाइलवर ५०० रुपये दंडाची पावती आली. त्यानंतर २८ जुलैला आणखी एक दंडाची पावती आली. वारंवार नियमभंग केल्याप्रकरणी चलनाची पावती येत असल्याने सुशील यांनी प्रीतम यांना फोन करून विचारणा केली. त्या वेळी प्रीतम १५ दिवसांपासून आजारी असून, त्यांची रिक्षा घराबाहेर असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर सुशील यांनी ऑनलाइन दंडाची पावती उघडून त्यात रिक्षाचा फोटो पाहिला असता, त्यात त्यांच्या रिक्षाचा नंबर असलेली रिक्षा दिसली. मात्र ती रिक्षा आणि चालक यांच्यात फरक असल्याने सुशील यांनी थेट पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात धाव घेतली. आपल्या रिक्षाचा नंबर अनोळखी व्यक्तीने त्याच्या रिक्षाला लावला आहे. संबंधित व्यक्ती वाहतुकीचे नियम मोडत असून, दंडाची पावती मात्र आपल्याला येत असल्याचे सुशील यांनी वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. तशा आशयाची त्यांनी लेखी तक्रारही नोंदवली.

नेमके काय झाले?

बुधवारी (९ ऑगस्ट) सकाळी साडेनऊ वाजता सुशील काळेवाडी येथील तापकीरनगर येथे आले असता, त्यांना आपल्या रिक्षाच्या नंबरशी साधर्म्य असलेली रिक्षा दिसली. त्यांनी तत्काळ ‘११२’ या क्रमांकावर फोन करून पोलिसांना माहिती दिली. वाकड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत रिक्षा पोलिस ठाण्यात आणली. रिक्षाची पाहणी केली असता, त्या रिक्षाचा नंबर वेगळाच असल्याचे निष्पन्न झाले.

ठाकरे कुटुंबातील व्यक्तीच तुरुंगात जाणार; शिंदेंसोबत गेलेल्या आमदाराचा धक्कादायक दावा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *