पुणे : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन ( Nirmala Sitharaman ) पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यात त्यानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आज दुपारच्या सुमारास निर्मला सितारामन ( Nirmala Sitharaman Baramati Visit ) यांचा ताफा वारजे माळवाडी परिसरातून जात असताना आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महागाई, जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटी, जनविरोधी आर्थिक धोरणे याचा निषेध करत निर्मला सीतारामन यांच्या गाडीचा ताफा अडवला.

अचानक कार्यकर्ते रस्त्यावर आल्याने काही पोलीसही चक्रावून गेले होते. वारजे माळवाडी परिसरातील आपचे कार्यकर्ते निलेश वांजळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. यावेळी या कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात, केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात व ‘ऑपरेशन लोटस’ विरोधात घोषणा देण्यात आल्या. यानंतर ‘आप’च्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

निर्मला सितारामन यांच्या समोर कार्यकर्त्यांनी एकच घोषणाबाजी केली. देशासह राज्यात वाढलेल्या महागाईला जबाबदार कोण, अनेक वस्तूंवर वाढवलेली जीएसटी कमी करण्याची मागणी यावेळी या कार्यकर्त्यांनी केली आहे. कार समोरून पोलिसांनी त्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत अर्थमंत्र्यांच्या ताफ्याला जाण्यास जागा करून दिली. यावेळी आपचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले.

Sitharaman : केंद्रीय मंत्री सितारामन बारामती दौऱ्यावर का आल्या? भाजप नेत्याने जाहीरपणे सांगितलं…

निर्मला सितारामन या पुणे दौऱ्यात बारामतीचा देखील दौरा करणार आहेत. त्यात महत्त्वाच्या गोष्टींचा आढावा देखील त्या घेणार आहेत. भाजपकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी करण्यात सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निर्मला सितारामन या पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. त्यात त्यांच्यावर बारामती मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आल्याने त्या बारामतीचाही दौरा करणार आहेत.

Supriya Sule : भाजपने सरनाईक कुटुंबाची जाहीर माफी मागावी, सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?Source link

Leave a Reply

Your email address will not be published.