पुणे : पुण्यातील धायरी या परिसरातील एका ३२ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा तरुण लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. या तरुणाने स्वतःच्याच हाताने कटरने गळा चिरून घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्त्यावरील धायरी येथे शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

महेश राजाराम तवंडे (वय ३२, ओम नमः सोसायटी, मुक्ताई नगर, रायकर मळा, धायरी, पुणे) असे मृत तरुणाचे नाव असून आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्रा, नैराश्यातून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. महेश हा मूळचा कोल्हापूरचा होता.

Weather Alert : राज्यात अस्मानी संकट कायम, पुण्याला यलो तर ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश हा खाजगी कंपनीत ग्राफिक्स डिझायनर म्हणून नोकरी करायचा. त्याच्या मैत्रिणीसोबत फ्लॅट भाड्याने घेऊन तो लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होता. त्याची मैत्रिण बीएससी नर्सिंग अभ्यासक्रमाचे शिक्षण घेते. ती देखील कोल्हापूरची आहे. काही दिवासांपूर्वी ती गावी गेली होती. त्यामुळे महेश हा एकटाच फ्लॅटवर राहत होता. तो मानसिक तणावात होता.

दिवसा तो कुणाशी तरी मोठ्याने फोनवर बोलत होता. संशय आल्याने रात्री घरमालकाने दरवाजा ठोठावला असता आतमधून प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी महेश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याचा मृतदेह ससून रुग्णालयात पाठविला आहे.

गडकिल्ल्यांसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करा, सीएसएमटी येथे शिवप्रेमींचं आंदोलनSource link

Leave a Reply

Your email address will not be published.