आंदेकर खून प्रकरणात आरोपींची बेकायदेशीर घरे असल्यास पाडून टाकणार:पुणे पोलिस आयुक्तांचा गुन्हेगारांना कडक इशारा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत एकूण 18 आरोपींना अटक केलेली आहे. या खूनाच्या घटनेमुळे पुन्हा एकदा टोळी युद्ध भडकण्याचा चिन्ह आहेत .त्यामुळे पुणे पोलिस आक्रमक झाले असून गुन्हेगारांनी आत्ताच त्यांच्या वागणुकीत सुधारणा केली नाही तर, ज्या गुन्हेगारांचे आणि आरोपींचे घर अवैधरीत्या बनवण्यात आले आहे किंवा जबरदस्तीने एखाद्याच्या जमिनीवर कब्जा करून घर बनवले असेल अशा अनाधिकृत घरांवर पुणे महानगरपालिकेच्या मदतीने पाडापाडी करण्याची कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. कोणत्याही गुन्हेगाराने पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील त्यांनी सांगितले आहे .वनराज आंदेकर खून प्रकरणात ज्या आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे ,त्यांच्या घरांची पोलिस झडती घेण्यात आलेली आहे.आरोपींनी एक वर्षापूर्वीच सहा ते सात पिस्तूल मध्यप्रदेश येथून बेकायदेशीर रित्या आणले होते. आंबेगाव पठार याठिकाणी प्रामुख्याने सोमनाथ गायकवाड या आरोपीच्या टोळीतील सदस्य राहतात. त्यांच्या घर झडतीत गुन्ह्यातील पिस्तूल मिळून आलेले नाही. त्यामुळे आरोपींशी निगडित जे नातेवाईक किंवा जवळचे लोक आहेत त्यांच्या देखील घरांची झडती घेतली जाणार आहे. वनराज आंदेकर खून प्रकरणात पिस्तूल आणण्यासाठी कोणी आर्थिक मदत केली याबाबत देखील सखोल तपासणी करण्यात येत आहे .या प्रकरणात आणखी तीन ते चार आरोपींची नावे निष्पन्न होऊ शकतात अशी संभावना पोलिसांनी व्यक्त केली आहे. येरवडा कारागृहात असलेल्या गुन्हेगार सुरज ठोंबरे यांच्या सहभागाबाबत देखील तपासणी करण्यात येत आहे. मागील दीड महिन्यापासून आंदेकर खुनाची तयारी करण्यात येत होती. आरोपींनी पैसे गोळा करण्यासाठी कोणावर जबरदस्ती केली आहे का याबाबत देखील पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे .बुधवारी रात्री आंबेगाव पठार परिसरात कॉम्बिग ऑपरेशन राबविण्यात आले. यामध्ये वेगवेगळ्या आरोपींच्या घराची तपासणी करण्यात आली आहे. टोळीतील जे आरोपी मोक्का तसेच इतर गुन्ह्यातून बाहेर आलेले आहेत त्यांच्यावर देखील नजर ठेवण्यात येत आहे.त्याचप्रमाणे सदर गुन्हेगारांची कुंडली तयार करून त्यांच्या घरी जाऊन त्यांना पोलिसांकडून इशारा देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आंदेकर टोळी आणि गायकवाड टोळी याच्याशी निगडित वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात जी प्रलंबित प्रकरणे आहेत त्याचा देखील आढावा घेण्यात येत आहे .आरोपींनी हत्यारे नेमकी कुठे लपवून ठेवली आहे याबाबत अधिकचा तपास करण्यात येत आहे.