पुणे : सिंहगड रस्त्यावरील ( Sinhagad Road Pune ) किरकटवाडी येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी फ्रीस्टाइल हाणामारी झाली. पार्किंगमध्ये ड्रेनेजचे पाणी सोडण्याच्या व रस्त्यावरून ये-जा करण्याच्या वादातून ही हाणामारीची घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या हाणामारीत महिलाही जखमी झाल्या आहेत. दोन्ही बाजूंकडून हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे. सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडीतील शिवनगर परिसरात राहणाऱ्या हनुमंत भरेकर, दिनकर भरेकर व त्यांच्या कुटुंबीयांना शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या मनोज पांडे, नागेश दारवटकर व इतरांनी रस्त्यावरून जाण्यास विरोध करत शिवीगाळ केली. त्याबाबत हनुमंत भरेकर व दिनकर भरेकर यांनी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. तुम्ही आमच्या विरोधात का तक्रार केली? असे म्हणत सोमवारी रात्री नागेश दारवटकर याने भरेकर यांना बाचाबाची केली.

Pune : हिंदू राष्ट्र संघटनेच्या अध्यक्षावर हल्ला प्रकरण; तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

भांडणाचा आरडाओरडा ऐकून भरेकर यांच्या घरातील महिला व मुलं तसेच शेजारच्या इमारतीतील इतर व्यक्ती तेथे जमा झाले. काही वेळातच शाब्दिक बाचाबाचीचे रुपांतर लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी तुंबळ हाणामारीत झाले. पुरुषांसह या हाणामारीत दोन महिलांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. याबाबत नागेश दारवटकर यांनी भरेकर कुटुंबीयांच्या विरोधात तर अमृता भरेकर यांनी मनोज पांडे, नागेश दारवटकर, गणेश दारवटकर व इतरांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रामदास बाबर याबाबत अधिक तपास करीत आहेत.

सराईत गुन्हेगारासोबत फोटो व्हायरल, अडचणीत सापडलेल्या डूप्लिकेट सीएम विजय मानेंचं स्पष्टीकरणSource link

Leave a Reply

Your email address will not be published.