पुणे विदेशात नाही तर देशातच हे नरेंद्र मोदींना सांगा:तेव्हा त्यांचे दौरे बंद होतील; आमदार आदित्य ठाकरे यांचा खोचक टोला
पुणे हे विदेशात नाही तर आपल्याच देशात आहे, हे भाजपच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांना सांगावे. तेव्हा त्यांचे पुण्यातील दौरे बंद होतील, अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला आहे. पावसामुळे मोदींचा आजचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा अलिकडच्या काळातील तिसरा दौरा होता. यावरुन आदित्य ठाकरे यांनी ही टीका केली. पावसामुळे काल उद्भवलेल्या परिस्थितीवरुन देखील त्यांनी सरकारवर निशाणा साधला. राज्य सरकार आणि केंद्र सरकारची भूमिका केवळ कंत्राट, खोके आणि पैसे एवढीच असल्याची टीका देखील आदत्य ठाकरे यांनी केली. दोन वर्षात केवळ महाराष्ट्राला लुटण्याचे काम राज्य सरकारने केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे. राज्यातील घटना बाह्य सरकारचे रस्त्याचे घोटाळे मी समोर आणले आहेत. रस्त्यांच्या कामातील दोन वेळा घोटाळे उघड केले असल्याचा आरोप देखील त्यांनी केला. मुंबईत कुठे पाणी साचले आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी कालच पत्रकार परिषदेमध्ये विचारला होता. त्यानंतर अर्ध्या तासातच त्यांच्या कामाचे पितळ उघड पडले, अशा शब्दात त्यांनी एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधला. मुंबईमध्ये काल झालेल्या पावसामुळे ठीक ठिकाणी पाणी साचले होते. यावरून त्यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. या आधी इतके अकार्यक्षम आणि घटनाबाह्य मुख्यमंत्री महाराष्ट्रानेच नव्हे तर देशाने देखील कधीच पाहिले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. राज्य सरकारच्या कामकजावर प्रश्नचिन्ह मुंबईत अनेक ठिकाणी रस्ते खोदलेल्या अवस्थेत आहेत? काल एकही अधिकारी रस्त्यावर का दिलसा नाही? पंप हाऊस चालू स्थितीत आहेत का? ते वेळेवर का चालू केले नाही? मुंबई, पुणे, ठाण्यामध्ये वार्ड अधिकारी का नेमले नाहीत? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहे. यावरुन राज्य सरकार केवळ कंत्राट, खोखे आणि पैशांवर लक्ष देत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… संजय राऊतांचा जन्मच खोटे बोलण्यासाठी झाला:आता त्यांनी न्यायालयाचा निर्णय स्वीकारावा; चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार संजय राऊत यांचा जन्मच खोटे बोलण्यासाठी झाला आहे. ते रात्री काहीतरी लिहित बसतात आणि सकाळी बडबड करतात. आपण दिवसभर टीव्हीवर दिसायला पाहिजे म्हणून ते काहीही खोटे बोलत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. संजय राऊत यांना अब्रुनुकसानीच्या प्रकरणात झालेल्या शिक्षेवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पूर्ण बातमी वाचा… संजय राऊत अब्रूनुकसानीच्या खटल्यात दोषी:कोर्टाने ठोठावली 15 दिवसांची कैद, 25 हजारांचा दंड; मेधा सोमय्यांनी दाखल केला होता दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाब्यात माझगाव न्यायालयाने त्यांना 15 दिवसांची कैदेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने आजच हा निकाल दिला. या प्रकरणात संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेसह 25 हजारांचा दंडाची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा… अजित पवार आता आमदार देखील राहणार नाहीत:उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावरुन टीका उपमुख्यमंत्री अजित पवार हे आता पाचव्यांदा उपमुख्यमंत्री झाले आहेत. मात्र आता यापुढे ते उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री बनणार नाहीत. कदाचित ते आता आमदार देखील राहणार नाहीत, असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबतची इच्छा व्यक्त केली होती. या या बाबतच्या प्रश्नावर संजय राऊत यांनी ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… अजित पवारांचा काँग्रेसला धक्का?:आमदार सुलभा खोडके घड्याळ बांधण्याच्या तयारीत; मतदारसंघात लावले स्वागताचे बॅनर अमरावती विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार गटात प्रवेश करणार असलयाची चर्चा आता सुरू झाली आहे. अजित पवार यांच्या हस्ते अमरावती विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अमरावती मध्ये आलेले अजित पवार यांच्या स्वागताचे बॅनर आमदार खोडके यांनी लावले आहेत. यामुळे आता याबाबतची चर्चा जास्तच रंगली आहे. पूर्ण बातमी वाचा… काँग्रेसच्या नेत्यांनी सबुरीने घ्यावे:’अति आत्मविश्वास काँग्रेसचा घात करू शकतो’; दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी टोचले राज्यातील नेत्यांचे कान आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. जागा वाटपात जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी काँग्रेस नेत्यांचे कान टोचले असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याबाबत राज्यातील नेत्यांनी सबुरीने घ्यावे, असा सल्ला दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी दिला आहे. पूर्ण बातमी वाचा…