उस्मानाबाद : मराठा समाजाला ओबीसी कोट्यामधून आरक्षण मिळावे यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी १ लाख मराठा बांधवाच्या उपस्थित उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने ” एक मराठा,लाख मराठा” अशा घोषणा देत जनजागृती करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता भव्य अशी शिस्तबद्धरित्या समाजातील नागरिक, विद्यार्थ्यांची शहरातून रॅली काढण्यात आली.” आरक्षण आमच्या हक्काचे,नाही कुणाच्या बापाचे” अशा घोषणांनी कळंब शहर दणाणून गेले होते. (Tomorrow, 1 lakh Maratha protestors are going to organize a Mahamorcha in Kalamb city to demand reservation)

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आरक्षण नसल्याने मराठा विद्यार्थ्यावर अन्याय होत आहे. शासनाकडून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हालचाली दिसून येत नाहीत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ एकच मिशन ओबीसीमधून मराठा आरक्षण ‘ अशा प्रकारच्या विविध मागण्याचे निवेदन उपविभागीय अधिकऱ्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी सकल मराठा समन्वयक समितीकडून करण्यात आली आहे.

खळबळ! पोलिसांना मिळाली गुप्त माहिती, कारवाईदरम्यान आली धक्कादायक माहिती समोर
शहरात स्वागत कमानी, भगवे झेंडे, वाहन पार्किंग, बाहेरगावून, ग्रामीण भागातून मोर्चासाठी येणाऱ्या समाज बांधवांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य बाजार पेठेतून ही रॅली कथले चौक, मुंडे गल्ली, एसबीआय बँक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली. राष्ट्रगीताने रॅली ची सांगता करण्यात आली.

खबरीने दिली गुप्त माहिती; पोलिसांच्या नजरेची कमाल, पकडला लाखोंचा नजर
सकल मराठा समाजाने आयोजित केलेल्या रॅलीमध्ये व्यापारी, महिला,शेतकरी,विद्यार्थी,वकील,राजकीय पक्षातील कार्यकर्ते,नेते,पत्रकार बांधव, डॉक्टर,सामाजिक क्षेत्रात काम करणारे मराठा समाजातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

Osmanabad News : महिला भक्तांसोबत विनयभंग, लोमटे महाराजाला दीड महिन्यांनी अटक; वाचा संपूर्ण प्रकरणSource link

Leave a Reply

Your email address will not be published.