पुण्यात इंजेक्शन देत अल्पवयीन चुलत बहिणीवर केला अत्याचार:शाळेतील तक्रारपेटीमुळे प्रकार उघडकीस, आरोपी अटकेत
अल्पवयीन चुलत बहिणीला भुलीचे इंजेक्शन देऊन बलात्कार करून त्याचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी २१ वर्षीय चुलत भावाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे. ही घटना १९ फेब्रुवारी २०२१ पासून २३ नाव्हेंबर २०२३ या दरम्यानच्या काळात ताडीवाल रोड परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने १४ वर्षीय पीडित मुलीला दंडात भुलीचे इंजेक्शन दिले. यानंतर पीडित बेशुद्ध पडली. याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार करून तिच्या नकळत ते फोटो काढले. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर आणि भेटायला बोलावले तेव्हा न गेेल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक काळे करत आहेत. दरम्यान, मुलीनी अत्याचार झाल्यास पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शाळेने दिली पोलिसांना माहिती पीडित मुलगी एका शाळेत शिक्षक आहे. ही घटना वडिलांना सांगितल्यावर ते चिडतील आणि त्यामुळे वाद होतील यामुळे मुलीने कोणालाही सांगितले नव्हते. बदलापूरच्या घटनेनंतर प्रत्येक शाळेत तक्रार पेटी लावण्यात आली आहे. मुलाने शाळेतील तक्रार पेटीत तिच्या सोबत झालेला प्रकार लिहून टाकला होता. त्याची दखल घेत शाळेच्या प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.