पुणे : पुण्यातील दरी पूल, नवले पूल, तसेच भुमकर चौक या ठिकाणावर होणाऱ्या अपघातांचं सत्र काय थांबायचं नाव घेत नाहीये. आठवडा किंवा महिनाभरात या तीन पुलांपैकी कुठे ना कुठेतरी अपघात होतच असतो. आज पहाटे ४ च्या दरम्यान पुण्यातल्या जांभुळवाडी येथील दरी पुलावर चार वाहनांचा अपघात झाला आहे. मोठा कंटेनर चालवणाऱ्या चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो एका लक्झरी बसला जाऊन धडकला आणि नंतर टेम्पो व एका चारचाकीला जाऊन धडकला. त्यानंतर तो कंटेनर थेट डिव्हायडरवर जाऊन धडकला.

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे चारच्या सुमारास अग्निशमन विभागाला माहिती प्राप्त झाली की, जांभळवाडी येथील दरी पुलावर एक कंटेनरने एका लक्झरी बसला तसेच चारचाकी आणि टेम्पोला धडक दिली आहे. याठिकाणी मोठा अपघात झाला आहे. त्यानुसार अग्निशमन विभाग तसेच पीएमआरडी अग्निशमन दलाकडून घटनास्थळी चार वाहने रवाना करण्यात आली होती. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर अपघातात अडकलेल्या दोन नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं त्यासोबत चार गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

सामन्याचा पहिला चेंडू टाकल्याशिवाय वर्ल्डकपमधून पाकिस्तान कसा बाहेर पडेल? जाणून घ्या समीकरण
मात्र, या घटनेत कंटेनर चालक आणि बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची ओळख अद्याप पटली नाहीय. घटनास्थळी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड दाखल झाले असून पंचनामाचे काम सुरू आहे. पुढील तपास आता भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन करत आहे.

Raghuram Rajan: ‘आपण चीनसमोर टिकत नाही…’, आरबीआयचे माजी गव्हर्नर नेमकं काय म्‍हणाले? वाचा सविस्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *