पुण्यात धक्कादायक घटना:अभ्यासाच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

पुण्यात धक्कादायक घटना:अभ्यासाच्या तणावातून दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

दोन दिवसांवर आलेली दहावीची परीक्षा आणि अभ्यासाचा ताण यामुळे एका दहावीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना मोहम्मद वाडी परिसरात घडली. रेहा प्रशांत वर्गीस असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ८) सकाळी सात ते रात्री नऊच्या सुमारास घडली. रेहा वर्गीस हीने राहत्या घरी सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणाची माहिती डॉक्टर उमा कुलकर्णी यांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद पोलिस ठाण्यात ठाण्यात करण्यात आली आहे. आत्महत्या करताना आरोपी पतीने केले चित्रीकरण आत्महत्येस प्रवृत्त करीत असतानाचा व्हिडीओ चित्रीत करून महिलेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दुसर्‍या पतीवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकबुल शेख (रा. संतोषनगर, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर जयंती पटेल असे आत्महत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत महिलेच्या अठरा वर्षीय मुलीने आईच्या आत्महत्येप्रकरणी फिर्याद दिली आहे. गळफास घेतलेली महिला ही मुळची मध्यप्रदेशातील आहे. तिला फिर्यादीसह दोन मुली आणि एक मुलगा आहे. महिलेचे तिच्या पतीबरोबर पटत नसल्याने तिला काही वर्षापूर्वी सोडून दिली. त्यानंतर सर्वजण वडगावशेरी येथे त्यांच्या भावाकडे राहण्यास आले होते. तेथे महिलेच्या आईची ओळख मकबुल शेख याच्याशी झाली. त्याचा पहिला विवाह झाला असताना मुलांना सोडून मकबुल शेख त्यांना 2021 पासून कात्रज येथील संतोषनगर येथे राहू लागला. या दरम्यान त्यांना एक मुलगीही झाली. याच दरम्यान त्याला दारूचे व्यसन असल्याने त्यांच्यात भांडणे होऊ लागली. त्यातून तो तिला मारहाण देखील करत असे फिर्यादी ह्या काकांसोबत पाटणला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना आईने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले. दरम्यान मकबुल शेख याने फिर्यादीची आई आत्महत्या करतानाचा व्हिडीओ काढला असून तो तिने पाहिला. तिची आई आत्महत्या करताना आरोपी मकबुल हा त्या ठिकाणी हजर असल्याचे व तो तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आई गळफास घेत असताना तो म्हणाला, हम बांध दे क्या, चलो हम बांध देते है, चलो ठिक है त्यांना महिलेनी गळफास घेतल्यानंतर मकबुल आईला हात तो छोडो उपरका असे म्हणत चिथावणी दिली. त्यानंतर महिलेनी देखील हात सोडले अन तिला गळफास बसून तिचा मृत्यू झाल्याचे फिर्यादीत सांगण्यात आले आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment