[ad_1]

पुणे : पुण्यामध्ये आज (शनिवार) जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील एकत्र आले होते. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून चंद्रकांत पाटील आणि अजित पवार हे सोबत असलेले कार्यक्रम, बैठका टाळत असल्याचे दिसत आहे. यातूनच पुण्याच्या दोन्ही दादांमध्ये कोल्ड वॉर सुरु प्रकर्षाने जाणवत. आज देखील चंद्रकांत पाटील हे अजित पवार पोहचल्यानंतर तब्बल २० मिनिटे उशिरा आले.

या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील उशिराने दाखल झाले. त्यावरुन अजित पवार यांनी त्यांना उपदेशाचे डोस पाचले. कार्यक्रमाला लवकर जायला शिका. लवकर वेळेवर उठायला शिका. चंद्रकांत पाटील स्टेजवर असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केले. यामुळे त्याची चांगली चर्चा रंगली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्यावतीने शिक्षक पुरस्कार व अध्यक्ष चषक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अजित पवार हे वेळेवर पोहचले मात्र पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे २० मिनिटे उशिरा या कार्यक्रमाला पोहचले, तोपर्यंत अजित पवार यांनी आपले भाषण सुरु केले. अजित पवारांचे भाषण सुरु असताना चंद्रकांत पाटील यांची एंट्री झाली. मात्र आपल्या भाषणाच्या शेवटी अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या उशिरा येण्यावरून सगळ्यांसमोर पाटलांचे कान टोचले.

समोर बसलेल्या विद्यार्थ्यांना उद्देशून अजित पवार म्हणाले कार्यक्रमाला लवकर जायला शिका. लवकर वेळेवर उठायला शिका. मात्र कर्यक्रमाला उशिरा आलेले चंद्रकांत पाटील स्टेजवर असताना अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्याने त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता हे सर्वच उपस्थितांच्या लक्षात आले. अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यापासून पुण्याचा कारभारी नेमका कोणता दादा? यावरून अजितदादा आणि चंद्रकांतदादा यांच्यात सुप्त संघर्ष सुरु आहे. त्याचाच पुढचा पार्ट आज जिल्हा परिषदेच्या या कार्यक्रमात पाहायला मिळाला.

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *