पुणे:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखीच वेशभूषा आणि कपडे परिधान करून हुबेहुब सीएम एकनाथ शिंदे बनून फिरणाऱ्या तोतया सीएम विजय नंदकुमार मानेवर युनिट दोनच्या पथकाने कारवाई केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. याबाबत खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास आप्पासाहेब जाधव यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विजय नंदकुमार माने यांच्यावर भांदवी कलम ४१९-५११, ४६९, ५००, ५०१, माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा –तशीच दाढी, कपाळावर लाल टिळा, पुण्यातले हे एकनाथ शिंदे पाहिलेत का?

तक्रारदार हे बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभुषा आणि पोषाख परिधान करणारा विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने व्हॉट्सअॅप आणि फेसबुक या सोशल मीडियाद्वारे माहिती घेतली असताना पोलिसांना एक फोटो मिळाला. फोटो पाहिल्यानंतर सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे असून सराईत गुन्हेगार शरद मोहोळ हा खुर्चीत बसल्याचे दिसत आहे.

हेही वाचा –मोहाली MMS प्रकरण: होय, तिने व्हिडिओ बनवले; आरोपी तरुणीच्या वकिलाचा मोठा खुलासा

आरोपी विजय माने हा नियमित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सारखी वेशभूषा आणि पोशाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा अशा पद्धतीने वावरत होता.

विजय माने याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची समाजातील प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबतचा फोटो सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हेही वाचा –गटविकास अधिकाऱ्याची एक चूक आणि थेट निलंबन, पाहा सामूहिक विवाहात असं काय घडलं?

एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांनो याच साबणानं तुमची धुलाई केली हे विसरु नका | एकनाथ शिंदेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.