पुणे : पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हत्या, बलात्कार यासह अनेक धक्कादायक घटना दररोज समोर येत आहेत. अशातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. यात पुण्यातील उच्चभ्रू परिसर असलेल्या कोरेगाव पार्कमध्ये रात्री गोळीबाराची घटना घडली आहे.

या घटनेत दोन गटात राडा झाला. या भांडणामध्ये चक्क हवेत गोळीबारही करण्यात आला. पुण्यातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या प्रकरणी सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

ठाकरे गटाच्या महिला शहर प्रमुखावर हल्ला, पक्षाचेच जिल्हाप्रमुख संशयाच्या भोवऱ्यात
या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ समोर आला असून व्हिडिओमध्ये काही आरोपी तरुणाला जबर मारहाण करत आहेत. सुरुवातीला ते त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करतात. यानंतर यातील एक आरोपी बंदूक बाहेर काढतो आणि हवेत गोळीबार करतो. यानंतर सगळे मिळून तरुणाला बेदम मारहाण करतात. विशेष बाब म्हणजे ही घटना रस्त्यावरच घडली असून आजूबाजूला अनेक वाहेन ये-जा करत असल्याचं दिसत आहे. गर्दीच्या ठिकाणीच ही धक्कादायक घटना घडली आहे.

आरोपी सोन्या दोडमणी याने त्याचेकडील कमरेला लावलेली बंदूक काढून हवेत गोळीबार केला. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने ७ ते ८ वेळा तरुणाच्या तोंडावर हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्याला जखमी केलं गेलं. यानंतर सगळे तिथून निघून गेले. मात्र, काही वेळाने यातील एक आरोपी पुन्हा घटनास्थळी आला आणि त्याने जखमी तरुणावर दगडाने वार केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच कैद झाली आहे. घटनेनंतर सर्व आरोपी तिथून पळून गेले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेत जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

विरोधकांना 50 खोके सत्ताधाऱ्यांनी कसे नेले, याचा हिशेब तर द्यावाच लागेल | गुलाबराव पाटीलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *