PWD कार्यालय फोडले, आ. वैभव नाईकांसह दोघांवर गुन्हा दाखल:शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरेंचे आमदार झाले होते आक्रमक

PWD कार्यालय फोडले, आ. वैभव नाईकांसह दोघांवर गुन्हा दाखल:शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरेंचे आमदार झाले होते आक्रमक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संतप्त होत आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात तोडफोड केली होती. या प्रकरणी आता आमदार नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी दुपारी कोसळला होता पुतळा राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा सोमवारी दुपारी कोसळला होता. या घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त बनले होते. आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दुपारी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य शिवप्रेमी यांनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात कार्यालयातील साहित्याची, खिडक्यांची तोडफोड केली होती. त्यानुसार सोमवारी रात्री उशीर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघां विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंते हे अधिक तपास करत आहेत. विरोधकांकडून राज्यसरकारवर हल्लाबोल पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारच्या वतीने संबंधित पुतळ्याची जबाबदारी ही केंद्राच्या अखत्यारित असलेल्या नौदल विभागाची असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार शिवरायांच्या नावाखाली मतांचे राजकारण करते, अन् जबाबदारी मात्र दुसऱ्याकडे टाकते, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. हे ही वाचा शिवरायांचा सतत अपमान करणे ही भाजपची मानसिकता:नाना पटोलेंचा हल्लाबोल; राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे.या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. – येथे वाचा पूर्ण बातमी

​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संतप्त होत आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात तोडफोड केली होती. या प्रकरणी आता आमदार नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी दुपारी कोसळला होता पुतळा राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा सोमवारी दुपारी कोसळला होता. या घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त बनले होते. आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दुपारी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य शिवप्रेमी यांनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात कार्यालयातील साहित्याची, खिडक्यांची तोडफोड केली होती. त्यानुसार सोमवारी रात्री उशीर पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघां विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक यशवंते हे अधिक तपास करत आहेत. विरोधकांकडून राज्यसरकारवर हल्लाबोल पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला जात आहे. तर दुसरीकडे राज्यसरकारच्या वतीने संबंधित पुतळ्याची जबाबदारी ही केंद्राच्या अखत्यारित असलेल्या नौदल विभागाची असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर विरोधकांनी पुन्हा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्य सरकार शिवरायांच्या नावाखाली मतांचे राजकारण करते, अन् जबाबदारी मात्र दुसऱ्याकडे टाकते, असा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. हे ही वाचा शिवरायांचा सतत अपमान करणे ही भाजपची मानसिकता:नाना पटोलेंचा हल्लाबोल; राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करण्याची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळतो ही अत्यंत लाजीरवाणी असून छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचा अपमान करणारी घटना आहे.या घटनेमुळे राज्यभरातील शिवप्रेमी जनतेमध्ये तीव्र संताप आहे. पुतळा कोसळल्या प्रकरणी फक्त ठेकेदार आणि अधिकारी नाही तर राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. – येथे वाचा पूर्ण बातमी  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment