ठाणे : डोंबिवलीतील रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु असताना भिंत कोसळून पाच मजूर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यापैकी दोन मजूरांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी तातडीने अग्नीशमन पथक दाखल झाले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.

डोंबिवली पश्चिमेतील रेल्वेच्या संरक्षक भिंतीचे काम सुरु होते. संध्याकाळी साडे चार वाजताच्या दरम्यान अचानक भिंत कोसळली. यात भिंतीच्या ढिगाऱ्याखाली पाच मजूर अडकले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी मजूरांना बाहेर काढण्यात आले आहे.

मूनलाइटिंग प्रकरणात दिग्गज IT कंपनीची मोठी कारवाई, ३०० कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड
जखमींना डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णलायात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दल आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे.

जखमींचे नावे

माणिक पवार (वय ६२)

विनायक चौधरी (वय ३५)

युवराज गुत्तवार (वय ३५)

मृतांची नावे

मल्लेश चव्हाण (वय ३५०

बंडू कोवासे (वय ५०)

अजून या संदर्भात अधिकृत मिळू शकली नाही . नक्की हा अपघात कसा झाला याचा तपास पोलिसांकडून सुरु झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हार्दिक पंड्यामुळे मिळाला ऑस्ट्रेलियाला विजय, सामनावीर कॅमेरून ग्रीनचा मोठा खुलासाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.