मुंबई : पश्चिम रेल्वे आणि मेट्रो यांजी जोड असलेल्या अंधेरी रेल्वे स्थानकाच्या सुधारणेला पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सुरूवात करण्यात येत आहे. या कामांसाठी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ४-५ वरील जुन्या पादचारी पूलाच्या दक्षिण दिशेकडील पायऱ्या बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.अंधेरी स्थानकातील जुन्या पुलाच्या पायऱ्यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. रविवार, १९ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून पायऱ्यांचे तोडकाम सुरू करण्यात येणार आहे. यामुळे २० दिवसांसाठी पायऱ्या प्रवासी वापरासाठी बंद राहणार आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. पुलाचा वापर करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी फलाट क्रमांक ६-७वरील पायऱ्यांचा पर्याय उपलब्ध आहे. पूर्वेकडील सरकत्या जिन्यांसह पश्चिमेकडील उन्नत डेक आणि फलाटाला जोडणारे अन्य पादचारी पूल यांचा प्रवाशांनी वापर करावा, अशा सूचना रेल्वे प्रशासनाने केल्या आहेत.

सहा स्थानकांमध्ये विकासकामे

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या १७ रेल्वे स्थानकांच्या सुधारणेचे काम हाती घेण्यात आले आहेत. एमयूटीपी ३ अ अंतर्गत स्थानक सुधारणांसाठी ९४७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सहा रेल्वे स्थानकांच्या सुधारणेची कामे सुरू असून उर्वरित रेल्वे स्थानकांतील कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत.

कामे वेगात सुरू

घाटकोपर रेल्वे स्थानक सुधारणेचे काम दोन टप्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्याचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण झाल्यावर रेल्वेसह मेट्रो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. नेरळ, कसारा, कांदिवली, मिरारोड आणि खाररोडदरम्यान स्थानक सुधारणेची कामे वेगाने सुरू आहेत, असे एमआरव्हीसीने स्पष्ट केले आहे…………Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *