शपथविधीपूर्वी शिवतीर्थावर घडामोडींना वेग:मनसेच्या दारुण पराभवानंतर राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

शपथविधीपूर्वी शिवतीर्थावर घडामोडींना वेग:मनसेच्या दारुण पराभवानंतर राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून महायुतीला बहुमत मिळाले आहे. तसेच 25 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियम अथवा राजभवनात शपथविधी देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी राज ठाकरे यांच्या दादर येथील शिवतीर्थ या निवासस्थानी बैठक बोलावली आहे. मनसेचे प्रमुख नेते या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत राज ठाकरे काय बोलणार तसेच बैठकीत काय महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार याकडे लक्ष असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 128 मतदारसंघात उमेदवार उभे केले होते. मात्र, मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तसेच मनसेचा एकमेव आमदार राजू पाटील हे देखील पराभूत झाले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात अमित ठाकरे यांचा देखील पराभव झाला आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या या दारुण पराभवानंतर राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. सोमवारी होणारी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपने उत्तम कामगिरी केली आहे. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर महायुतीमधील कोणता चेहरा पुढे येतो याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment