याबाबत बीसीसीआयने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये जय शाह आणि रजनीकांत हे दोघेही दिसत आहे. या फोटोमध्ये जय शाह हे रजनीकांत यांना एक गिफ्ट देत असल्याचे पाहायला मिळत आहे. या ट्विटमध्ये बीसीसीआयने लिहिले आहे की, ” या दिग्गज अभिनेत्याने भाषा आणि संस्कृतीच्या पलीकडे जाऊन लाखो लोकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. त्यामुळे त्यांच्याशी आम्ही जोडले जात आहोत, याचा आनंद आहे. रजनीकांत यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीच्या उपस्थितीने वर्ल्ड कपसारखा मोठा कार्यक्रम उजाळून निघेल.” आज जय शाह यांनी रजनीकांत यांची भेट घेऊन त्यांना खास भेट दिली, ही भेट आहे वर्ल्ड कप २०२३ चे गोल्डन तिकीट. वर्ल्ड कपला सुरुवात होण्यापूर्वी पहिले तिकीट हे बीसीसीआयने रजनीकांत यांना दिले आहे. रजनीकांत हे क्रिकेटचे चाहते आहेत आणि यापूर्वीही ते क्रिकेटच्या सामन्यांना उपस्थित राहीलेले आहेत. पण आता या वर्ल्ड कपमध्ये ते आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी रजनीकांत यांना वर्ल्ड कपची खास भेट म्हणून गोल्डन तिकीट दिले आहे. त्यामुळे आता वर्ल्ड कपच्या कार्यक्रमात रजनीकात आपल्याला दिसू शकतात. भारतााच्या जवळपास सर्व सामन्यांना ते उपस्थिती लावतील असे म्हटले जात आहे. खासकरून भारत – पाकिस्तान सामन्याला तर ते उपस्थित राहतील.