मुंबई- प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे बुधवार २१ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी AIIMS, नवी दिल्ली येथे निधन झाले. राजू हे भारतातील सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकार होते. राजू यांनी आपल्या विनोदाना अशी ओळख निर्माण केली होती की ते घरोघरी प्रसिद्ध झाले. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर राजू यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. ४० हून अधिक दिवसांच्या संघर्षानंतर अखेरीस ते जीवनाची लढाई हरले. मृत्यूनंतर राजूंच्या मृतदेहाचे शवविच्छेदन कोणतीही चिरफाड न करता केले गेले आणि मृतदेह कुटुंबियांना देण्यात आला.

राजू श्रीवास्तव यांची अखेरची इच्छा कुटुंबिय पूर्ण करतील का?

राजू श्रीवास्तव यांचे वर्टोप्सी

राजू श्रीवास्तव गेल्या ४२ दिवसांपासून एम्समध्ये दाखल होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची व्हरटोप्सी (virtopsy) म्हणजेच virtual atopy एम्समध्येच करण्यात आली. यामध्ये मृत शरीराची कोणतीही चिरफाड केली गेली नाही. यामध्ये अनेक मशिनच्या साह्याने मृतदेहाची तपासणी करून तो कुटुंबियांच्या ताब्यात दिला जातो. राजू यांच्या मृतदेहाबाबतही असेच करण्यात आले आहे.

वर्टोप्सीप्सी कशी केली जाते?

व्हर्च्युअल शवविच्छेदनात मृत व्यक्तीच्या शरीराची सीटी स्कॅन आणि एमआरआय यांसारख्या मशीनद्वारे तपासणी केली जाते. अशा मशिन्सच्या तपासणीत बहुतांश घटनांमध्ये मृत्यूचं कारण कळतं. प्रियजनांच्या पोस्टमॉर्टमवर अनेकांनी आक्षेप घेतल्याने हे तंत्र वापरले जात आहे.

राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू कसा झाला, सगळं ठीक होत असताना अचानक काय झालं?

राजू यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये पसरली शोककळा

१० ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव वर्कआउट करण्यासाठी जिममध्ये गेले होते. तेथे असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर ते बेशुद्ध झाले. या अवस्थेत त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. राजू यांच्या मेंदूपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नव्हता आणि नंतर त्यांच्या अनेक अवयवांनी काम करणं बंद केले. राजू यांना बराच काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. राजू यांच्या निधनावर बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील सर्व कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.