नवी दिल्ली : प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज २१ सप्टेंबर रोजी निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. नवी दिल्लीतील एम्स इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या ४० दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. जिममध्ये व्यायाम करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. राजू यांनी ४० दिवस एका लढवय्याप्रमाणं मृत्यूशी झुंज दिली, परंतु त्यांची ही झुंज अपयशी ठरली.

राजू श्रीवास्तव यांचा लढवय्या स्वभाव त्यांची मुलगी अंतरा हिच्यामध्येही उतरला आहे. तिच्या या धाडसी स्वभावासाठी तिला २००६ मध्ये राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ती अवघी १२ वर्षांची होती.

राजू श्रीवास्तवांचा मृत्यू कसा झाला, सगळं ठीक होताना अचानक काय झालं?

काय घडलं होतं नेमकं?

राजू श्रीवास्तव यांच्या घरी चोर घुसले होते. त्यावेळी अंतरा आणि तिची आई अशा दोघीच घरात होत्या. या चोरांकडे शस्त्र होती. चोरांनी घरात शिरल्या शिरल्या राजू यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं आणि त्यांना शस्त्राचा धाक दाखवत घरातील मौल्यवान वस्तू देण्याची मागणी केली. या चोरांच्या नजरेपासून अंतरा कसाबसा स्वतःचा बचाव करत बेडरुममध्ये गेली. तिथल्या खिडकीमधून तिनं बाहेर उभ्या असलेल्या चौकीदाराला घरात चोर शिरल्याची माहिती दिली. त्यानं तातडीनं पोलिसांना कळवलं आणि घटनास्थळी पोलिसांचं पथक दाखल झालं.

कोमात गेल्यावर काय होतं, काहीसे असे होते राजू यांचे शेवटचे दिवस

दरम्यान राजू श्रीवास्तवदेखील तिथं आले. पोलिसांनी चोरांना पकडलं आणि या दोघींची सुटका केली. अंतरानं दाखवलेलं प्रसंगावधान आणि शौर्याबद्दल तिला २००६ मध्ये राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अंतरानं २०१३ मध्ये फ्लाईंग ड्रीम एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड मध्ये सहाय्यक निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम केलं. तिनं ‘फुल्लू’, ‘पलटन’, ‘द जॉब’, ‘पटाखा’ आणि ‘स्पीड डायल’ या सिनेमांसाठी काम केलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.